IMPIMP

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा

by nagesh
Rain in Maharashtra | journey back to monsoon from the state was long rain updates

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाची (Maharashtra Monsoon Update) परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण (Konkan), पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) अनेक जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी देखील लावली आहे. असं असलं तरी काही ठिकाणी पाऊस झाला नसल्याची परिस्थिती आहे. भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) काल मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. सध्या तळकोकण आणि नाशिकमध्ये (Nashik) दमदार पाऊस बरसला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नाशिक शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने (Monsoon) हजेरी लावली आहे. दरम्यान, गोदा काठालगतच्या गटारीतील पाणी भरून वाहू लागल्याने सराफ बाजारासह दहिपुल परिसर पुन्हा जलमय झाला असल्याची परिस्थिती आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह काही ठिकाणी पावसाची रिपरिप दिसून आली. तर काही ठिकाणी पावसाची अपेक्षा असल्याचं वर्तवले आहे. (Maharashtra Monsoon Update)

दमदार, काही भागात पावसाची परिस्थिती नसली तरी कल्याणमध्ये पावसाचं धुमशान सुरू झालं आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा पश्चिमेकडील शहाड पुलाखाली पाणी साचलं आहे.
टिटवाळा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहतूक मुरमाड रोडमार्गे वळवण्यात आली आहे.
दरम्यान राज्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप दिसून येत आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | monsoon rain in mumbai nashik south kokan maharashtra

 

हे देखील वाचा :

LIC | 8 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीत मिळवा 50 लाखापेक्षा जास्त रिटर्न, फायद्याचा सौदा आहे LIC चा ‘हा’ प्लान

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या 34 आमदारांचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र, जाणून घ्या

Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले…

 

Related Posts