IMPIMP

Maharashtra Police Recruitment | बेरोजगारांसाठी खुशखबर! राज्यात 18 हजार जागांसाठी लवकरच पोलीस भरती, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (व्हिडिओ)

by nagesh
Police Bharati | transgender can also apply online for the post of police constable

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस भरतीबाबत (Maharashtra Police Recruitment) मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्यात 18 हजार जागांसाठी पोलीस भरती केली जाणार आहे. आठवडाभरात या भरतीची जाहिरात (Maharashtra Police Recruitment) काढली जाईल. केंद्र सरकारने (Central Government) 10 लाख तरुणांना रोजगार देण्याची योजना आजपासून सुरु केली आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात 75 हजार तरुणांना नोकरी दिला जाईल. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) देखील ही रोजगार योजना राबवणार आहे, असे फडणवीस म्हणाले. ते नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) पत्रकारांशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) खूप चांगला निर्णय घेतला आहे. 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचा हा प्रकल्प आहे. आज 75 हजार तरुणांना नोकर्‍या देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत येत्या वर्षभरात महाराष्ट्रात 75 हजार तरुणांना रोजगार देण्याची योजना राबवणार आहोत.

 

 

देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती देताना म्हटले की, आम्ही ठरवले आहे की येत्या वर्षभरात महारात 75 हजार तरुणांना नोकर्‍या (Job) द्यायच्या. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही 18 हजार जागांसाठी पोलीस भरतीची जाहिरात (Maharashtra Police Recruitment) आठवडाभरात काढतो आहोत. मुख्यमंत्र्यांनी इतर विभागांनाही निर्देश दिले आहेत. सगळ्या विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणावर तरुणांना नोकरभरतीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जाणार आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीही आम्ही उपलब्ध करून देऊ.

 

दरम्यान, काल गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आरोग्या विभागातील 10 हजार 127 जागांच्या भरतीची (Health Department Recruitment) घोषणा करत भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले.  ते पुढील प्रमाणे

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आरोग्य भरती प्रक्रिया वेळापत्रक

 

– 1 जानेवारी ते 7 जानेवारीदरम्यान जाहिरात प्रसिद्ध होईल.
– 25 जानेवारी ते 30 जानेवारीदरम्यान अर्जांची तपासणी.
– 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान वैध ठरलेल्या अर्जांची यादी जाहीर होईल.
– 25 मार्च आणि 26 मार्च या दोन दिवसांत परीक्षा घेतल्या जातील.
– 7 मार्च ते 27 एप्रिलपर्यंत निकाल जाहीर करून उमेदवारांची नेमणूक केली जाईल.

 

 

Web Title :- Maharashtra Police Recruitment | devendra fadnavis announces mega recruitment in maharashtra police

 

हे देखील वाचा :

NCP on Shivsena | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हात लावला तर तलवारीने…, NCP आमदाराने थेट मित्रपक्ष शिवसेनेलाच दिला इशारा

Pune Crime | फसवणुकीच्या गुन्ह्यात कपील धिंग्रा आणि त्यांच्या पत्नीला जामीन मंजूर
MNS Deepotsav | मनसेच्या दीपोत्सवात शिंदे-फडणवीस हजर, युतीची चिन्हे!

 

Related Posts