IMPIMP

MNS Deepotsav | मनसेच्या दीपोत्सवात शिंदे-फडणवीस हजर, युतीची चिन्हे!

by nagesh
Maharashtra Politics | shivsena uddhav balasaheb thackeray group leader sunil shinde taut raj thackeray over mns bjp and shinde group maha yuti

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS Deepotsav | गेले अनेक दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पक्षाची जवळीक वाढली आहे. अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे आगामी काळात ठाकरे भाजप युती होणार का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दीपोत्सव (MNS Deepotsav) साजरा झाला. यावेळी तिघेही पुन्हा एकत्र आले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांचा शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सकारात्मकतेने विचार करत आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे – शिंदे – फडणवीस आघाडी होणार का, अशी चर्चा आहे. परंतु यावेळी शिवाजी पार्कवरील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असे सांगितले. दीपोत्सवाच्या (MNS Deepotsav) कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. मनसेतर्फे हा दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) निमंत्रणावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते.

 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, दीपोत्सव कार्यक्रमाचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका.
दिवाळी आपली संस्कृती आहे. दरवर्षी प्रमाणे मनसेने दीपोत्सव कार्यक्रम केला आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी
आम्ही आलो आहोत. यापूर्वी देखील दीपोत्सावाला हजर राहण्याची इच्छा होती. पण मला येता आले नाही.
त्यासाठी योगायोग लागतो. राज ठाकरे नेहमी माझ्याकडे शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन येतात.
चांगल्या सूचना करतात. आम्ही सरकारच्या माध्यमातून त्यांना योग्य प्रतिसाद देखील देतो.
त्यामुळे ते वेळी-अवेळी कधीही आमच्याकडे येऊ शकतात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MNS Deepotsav | cm eknath shinde said that no political meaning should be taken from mnss deepotsava programme

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सदाशिव पेठेतील बिर्याणी हाऊसमध्ये भीषण आग, 6 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या विश्वासू सहकार्‍याची भाजपाशी सलगी, नार्वेकर म्हणतात, ‘अमित शाहजी देव करो तुम्हाला…’

Pune Crime | दुसरीकडे पानटपरी लावल्याने जातीवाचक शिवीगाळ करणार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

 

Related Posts