IMPIMP

Maharashtra Political Crisis | राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी ! एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री संध्याकाळपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा देणार ?

by nagesh
Ajit Pawar Meets Eknath Shinde | ncp leader ajit pawar meets cm eknath shinde after govt give stay urban development 941 crores project

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | शिवसेनेत मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडाळीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग (Maharashtra Political Crisis) आला आहे. काल झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर (Maharashtra Legislative Council Election) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे सध्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर काही आमदारांसह सूरतमधील एका हाॅटेलमध्ये आहेत. दरम्यान, निवडणुकीत संख्याबळ नसताना भाजपाने (BJP) पाचवा उमेदवार उभा करून जिंकून आणला. या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेसची मते फुटली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्याचं समोर आलं.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एकनाथ शिंदेंनी मोठं पाऊल उचलल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, सध्या सुरत येथे भाजपा नेते आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरू आहे. काही वेळाने याठिकाणी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) पोहचणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ होणार असल्याची चर्चा आहे. अशातच आता काही आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीसोबत राहणं कठीण आहे, भाजपासोबत चला, असं त्यांनी उद्धव ठाकरेंना स्पष्टपणे सांगितलं आहे. (Maharashtra Political Crisis)

 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिंदे यांच्याजागी अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड घडताना दिसत आहे. एकनाथ शिंदे नेमकं काय निर्णय घेणार ? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

 

बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले..

“आपल्या सरकारला काहीही धोका नाही. जे नाराज आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तुम्ही आणि आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक, भगव्याचे रक्षक आहोत.
आपल्याला एकत्र राहायचं आहे,” असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आमदारांना दिला आहे.
मुंबईत सेंट रेजीस हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांना ठेवण्यात आले आहे.
त्या आमदारांसोबत शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि गटप्रमुख ही साखळी ठेवण्यात आली आहे.
तुर्तास या आमदारांमध्ये कुठली फोडाफोड होऊ नये यासाठी शिवसेना खबरदारी घेते आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | shivsena leader and maharashtra minister eknath shinde and his supporters may be resign till evening

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | एकनाथ शिंदेंबरोबर तुमचं काही डील झालंय का?; चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

Fenugreek Water Benefits | मेथीच्या पाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, वाचा सविस्तर

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या बेसिक सॅलरीत होईल मोठी वाढ, फिटमेंट फॅक्टरमुळे वाढेल पगार

 

Related Posts