IMPIMP

Maharashtra Political Crisis | 9 महिन्यानंतर सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण, निकाल कधी?

by nagesh
Maharashtra Political Crisis | uddhav thackeray vs eknath shinde supreme court hearing today maharahtra political crisis after 9 months the hearing of the power struggle waiting supreme court final verdict

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी तब्बल 9 महिन्यानंतर पूर्ण झाली. मागील नऊ महिन्यात सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) 5 न्यायाधिशांच्या खंडपीठाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), निवडणूक आयोग (Election Commission) आणि राज्यपालांच्या (Governor) वकिलांची बाजू ऐकून घेतली. संपूर्ण युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट कधी निर्णय देणार याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे (Maharashtra Political Crisis) लक्ष लागलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि सध्याचं सरकार असं असंवैधानिक असल्याचं उद्धव ठाकरे गटाने कोर्टात सांगितले. तर राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट (Floor Test) घेण्यास सांगून बरोबर केल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेना (Shivsena) आणि पक्षचिन्ह यावरील कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच नवीन अधिकृत तारीख जाहीर केली जाईल.

 

 

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत (Maharashtra Political Crisis) अंतिम टप्प्यात सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाची निरिक्षणं नोंदवली. यामध्ये राज्यपालांनी बोलावलेल्या बहुमताच्या चाचणीवर कोर्टाने कडक शब्दात ताशेरे मारले. तसेच आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं तोंडी मतही कोर्टाने मांडलं. ठाकरे गटाकडून नऊ महिन्यांपूर्वीची परिस्थिती जैसे थे करण्याची मागणी केली. मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे, त्यामुळे आम्ही परिस्थिती जैसे थे कशी करणार? असा प्रश्न सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांनी विचारला.

 

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत (Adv. Devadatt Kamat) यांनी संस्कृत सुभाषिताने युक्तिवादाचा
शेवट केला. कोकीळ आणि कावळा हे दोघेही एकाच रंगाचे… कधी कधी कावळा पण कोकीळ असल्याचं नाटक करतो,
पण जेव्हा पहाट होते तेव्हा पितळ उघडं पडतं… कोकीळ गाते आणि कावळा काव काव करतो,
असे कामत यांनी युक्तिवादाच्या अखेरीस म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये शिंदे गटाकडून (Shinde Group) हरिश साळवे (Harish Salve),
महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) आणि नीरज किशन कौल (Neeraj Kishan Kaul) यांनी
बाजू मांडली. तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल (Kapil Sibal) आणि अभिषेक मनु सिंघवी
(Abhishek Manu Singhvi) यांनी युक्तिवाद केला.
तर राज्यपाल आणि निवडणूक आयोगाच्या वकिलांनीही बाजू मांडली.

 

 

Web Title :-  Maharashtra Political Crisis | uddhav thackeray vs eknath shinde supreme court hearing today maharahtra political crisis after 9 months the hearing of the power struggle waiting supreme court final verdict

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

MP Supriya Sule | राष्ट्रीय जल अकादमीच्या जागेत क्रीडांगण तथा उद्यान उभारणीस जागा उपलब्ध करावी; खा. सुप्रिया सुळे यांची जलसक्ती मंत्र्यांशी चर्चा

National Highways in Pune District | पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम लवकरच पूर्ण करणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

 

Related Posts