IMPIMP

Maharashtra Political Crisis | शिंदे सरकार राहणार की जाणार? न्यायालयाच्या निकालापूर्वी विधानसभा अध्यक्षांचे महत्त्वाचं विधान

by nagesh
Maharashtra Political Crisis | supreme court will decision tomorrow on the dispute between shiv sena and shinde group rahul shewale and anil desai going to delhi

मुंबई :  बहुजननामा ऑनलाईन  Maharashtra Political Crisis | विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल लागण्याची शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय मंत्री रिजिजू (Union Minister Rijiju) यांची भेट घेतली. या भेटीवर राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. तसेच नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा (Resignation) द्यावा अशी मागणी राऊतांनी केली होती. यावर पत्रकार परिषद घेऊन राहुल नार्वेकर यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राहुल नार्वेकर म्हणाले, संजय राऊत यांचा कायद्याचा अभ्यास कमी आहे. त्यांनी रिजिजू आणि माझ्या भेटीचा चुकीचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला. आमदारांच्या अपात्रतेवर (MLA Disqualification) निर्णय घेण्याचा अधिकार माझा आहे. जर अध्यक्ष नसेल तर उपाध्यक्षांकडे ती जाबाबदारी येते. परंतु इथे पद रिक्त नसल्याने तो अधिकार अध्यक्षांचाच आहे. कुठलाही निर्णय (Maharashtra Political Crisis) आला तरी सरकार स्थिर राहणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

 

नार्वेकर पुढे म्हणाले, जर अध्यक्षांचा निर्णय चुकला तर कोर्टाला हस्तक्षेप करता येतो. त्यामुळे बेजबाबदार वक्तव्य टाळावीत. कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी. न्यायालयानं काहीही निर्णय दिला तरी सरकार स्थिर राहणार असल्याचे वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं आहे.

 

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court)
निकालावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
नार्वेकरांची केंद्रीय कायदा मंत्र्यांबरोबर बंद दाराआड तीन तास बैठक झाली.
या बैठकीत कायदा मंत्रालयाने (Ministry of Law) सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे राहुल नार्वेकरांना
सांगितले आहे का? सर्वोच्च न्यायालय असा निर्णय देणार आहे, तुम्ही लंडन दौऱ्यावर जा म्हणून राहुल नार्वेकरांना
कायदा मंत्र्यांनी सांगितले का? असे प्रश्न राऊतांनी उपस्थित केले आहेत. तसेच या बैठकीमुळे लोकांच्या मनात
शंका निर्माण होत आहे, असंही राऊत म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Maharashtra Political Crisis | vidhan sabha speaker adv rahul narvekars big statement while reacting to the power struggle hearing

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | ‘…तर ठाकरेंचे कपडे फाडणार’ नितेश राणेंच्या वक्तव्याला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ठाकरेंचे कपडे फाडण्याचा दम…’

Chitra Wagh On Sanjay Raut | ‘पंतप्रधानांवर बोलण्याची तुमची लायकी नाही’, संजय राऊतांच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 16 हजाराच्या लाच प्रकरणी महिला कनिष्ठ सहाय्यकासह शिक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

 

Related Posts