IMPIMP

Maharashtra Political News | महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 13, राष्ट्रवादीचे 20 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

by nagesh
Maharashtra Political News | all remaining 13 mlas of thackeray faction in touch with cm eknath shinde says uday samant

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political News | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्याला कारण म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी केलेले विधान. ठाकरे गटात (Thackeray Group MLA) उरलेले सर्वच्या सर्व 13 आमदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट सामंत यांनी केला आहे. एवढेच नाहीतर राष्ट्रवादीचे 20 आमदार (NCP MLA) आणि काँग्रेसचे (Congress) बडे नेते देखील शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच राजकीय भूकंप (Maharashtra Political News) होणार की काय? अशी चर्चा सामंत यांच्या विधानामुळे सुरु झाली आहे.

 

उद्योगमंत्री उदय सामंत हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. ते म्हणाले, ठाकरे गटातील उरलेले 13 आमदार, राष्ट्रवादीचे 20 आमदार आणि काँग्रेसमधील बडे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवले जाणार असल्याच्या चर्चेवर (Maharashtra Political News) बोलताना सामंत यांनी हा गौप्यस्फोट केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राऊत हे विद्वानांचे महामेरु बनलेत

यावेळी बोलताना उदय सामंत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. संजय राऊत (MP Sanjay Raut) हे जगातील सगळ्यात शाहणे आणि विद्वान आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत बोलणं मी आता सोडून दिले आहे. त्यांच्या समोर स्पर्धक म्हणून जगात एकही विद्वान शिल्लक नाही. देशातील सगळ्या विद्वानांचे राऊत हे महामेरु झाले आहेत. जगातील विद्वानांपेक्षा त्यांना जास्त अक्कल आहे, त्यांच्यावर काय बोलायचं? अशी टीका सामंत यांनी केली. संजय राऊत यांनी सरकारी कागद दाखवून शहाणपणा दखवू नये, अशी टीका केली होती. या टीकेला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले.

 

 

Web Title :- Maharashtra Political News | all remaining 13 mlas of thackeray faction in touch with cm eknath shinde says uday samant

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | ‘स्वयंभू असतात त्यांच्या मागे जनता जाते, शेंदुर फासलेल्यांना…’, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Mumbai Police Crime News – WPSI Death | महिला पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याने प्रचंड खळबळ

Mundhwa Jackwell -Kharadi STP | मुंढवा जॅकवेलमधून शेतीसाठी सोडण्यात येणार्‍या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची गुणवत्ता सुधारणार

NCP Chief Sharad Pawar | ‘तव्यावरची भाकरी फिरवली नाही तर करपते, त्यामुळे…’, शरद पवारांच्या विधानामुळे चर्चेला उधाण; पक्षात बदलाचे संकेत

 

Related Posts