IMPIMP

Maharashtra Politics | मुंबईतील नाराज भाजपा नेत्याचा शिंदे गटात प्रवेश, मित्रपक्षाला दिला धक्का! अंतर्गत वाद वाढण्याची शक्यता

by nagesh
Maharashtra Politics | devednra fadanvis chief ministers fellowship scheme will be started again

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Politics | बंडखोरी करून शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पाडत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपाच्या (BJP) मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. आता शिंदे गट आणि भाजपा सत्तेत आहेत. अजूनही शिंदे गटाकडून शिवसेनेतील आणि राष्ट्रवादीतील (NCP) नेते, पदाधिकारी आपल्याकडे घेण्याचे (Maharashtra Politics) सत्र सुरूच आहे. मात्र, आता शिंदे गटाने आपल्याच मित्रपक्षाला मोठा धक्का दिला आहे. भाजपाच्या नाराज असलेल्या मुंबईतील एका नेत्याला शिंदे गटाने गळाला लावले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी (Mumbai Municipal Corporation (BMC) शिंदे गटाच्या हालचाली वाढल्या आहेत. आपला गट मजबूत करण्यासाठी शिंदे गटाचे (Shinde Group) नेते सतत प्रयत्न करत असून यासाठी शिंदे गटातील आमदार, नगरसेवक यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईतील भाजप आमदारावर नाराज असलेल्या एका नेत्याने आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांच्या नेतृत्वाखाली थेट शिंदे गटात प्रवेश केला आहे.

 

शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राम यादव (Ram Yadav) आणि रेखा यादव
(Rekha Yadav) यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यादव दाम्पत्याने भाजपच्या आमदार मनीषा चौधरी
(MLA Manisha Chaudhary) यांच्यावर राजकीय कोंडी करत असल्याचा आरोप केला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ( Maharashtra Politics) राम यादव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने भाजपसाठी मोठा धक्का बसला आहे.

 

पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात राम यादव आणि रेखा यादव यांनी भाजपच्या स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांच्यावर नाव न घेता अनेक गंभीर आरोप केले. रेखा यादव यांनी म्हटले की, आमची सर्व नेत्यांवर नाराजी आहे.
आम्ही महिला नेत्याच्या कार्यालयात जायचो तेव्हा त्यांनी आम्हाला बसून दिले जात नसे.
आम्हाला त्यांची भेटही मिळत नव्हती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उत्तर भारतीय समाजाला आकर्षित करणारा एक नेता राम यादव यांच्या प्रवेशाने शिंदे गटाला मिळाला आहे.
शिंदे गटाने केलेल्या या कुरघोडीमुळे भाजप आणि शिंदे गटात महापालिका निवडणुकीपूर्वी कुरबुरी होऊ शकतात.

 

 

Web Title :- Maharashtra Politics | big setback to bjp ram yadav and rekha yadav join balasahebanchi shivsena eknath shinde group

 

हे देखील वाचा :

MLA Bachchu Kadu | आधी लोकांचे खिशे कापायचे आणि नंतर किराणा वाटायचा, बच्चू कडूंची नवनीत राणावर टीका

Maharashtra Police | मनसेचे गृहमंत्री फडणवीसांना पत्र, पोलिस बांधवांनाही दिवाळी बोनस द्या

Gold Price Today | दिवाळी-धनत्रयोदशीपूर्वी सोने स्वस्त, चांदीची चमक वाढली, जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts