IMPIMP

MLA Bachchu Kadu | आधी लोकांचे खिशे कापायचे आणि नंतर किराणा वाटायचा, बच्चू कडूंची नवनीत राणावर टीका

by nagesh
  MLA Bachchu Kadu | bacchu kadu reaction on sanjay raut statement on anandacha shidha

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन –  एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) आणि
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्यातील वाद दिवसेंदिवस सुरुच आहे. आता बच्चू कडू यांनी राणा दांपत्यावर टीका
केली आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) हे एक लाख कुटुंबांना दिवाळी किराणाचे (Diwali
Grocery) वाटप करणार आहेत, त्यावरुन बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी निशाणा साधला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी एका कार्यकर्त्याच्या कानाखाली मारली होती. त्यावेळी बच्चू कडू यांचे स्वत:वरचे नियंत्रण गेले आहे. त्यांनी स्वत:ला सांभाळले पाहिजे, असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या. त्यावर आता बच्चू कडू यांनी पलटवार केला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा एक लाख कुटुंबांना मोफक दिवाळी किराणा वाटप करणार आहेत. त्यावर कडू म्हणाले, आधी खिशे कापायचे आणि नंतर किराणा वाटायचा.

 

काही ठिकाणी मते मिळवायची असतील, तर राजकीय नेत्याला रक्ताची आहुती द्यावी लागते.
मी रक्तदान करून निवडणुकीचा अर्ज भरला होता.
राजकीय मंडळीत दान करण्याची प्रवृती असली पाहिजे. नाहीतर येथे आगोदर खिशे कापायचे आणि मग किराणा वाटणारे महाठग, महाअवलादी कमी आहेत का? असे देखील बच्चू कडू म्हणाले.

 

गोरगरिबांचे खिशे कापायचे, त्यांच्या खिशाला हात घालायचा, लोकशाहीचे पतन करायचे,
राजकारणाची ऐशी की तैशी करायची, असे नेते आपल्यात कमी आहेत का? ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
(Dr. Babasaheb Ambedkar) मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकारांचे पतन करुन आम्ही किराण्यावर
निवडून येतो, असे सांगणाऱ्या महाठगाला आपण सगळे पाहत आहोत, असे देखील बच्चू कडू (MLA Bachchu Kadu ) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MLA Bachchu Kadu | maha thugs who first cut their pockets and then distribute groceries bachu kadus anger on navneet rana dampatya

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police | मनसेचे गृहमंत्री फडणवीसांना पत्र, पोलिस बांधवांनाही दिवाळी बोनस द्या

Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर भीषण अपघात, रोहयो मंत्री संदिपान भुमरेंच्या मावस भावाचा मृत्यू

Gold Price Today | दिवाळी-धनत्रयोदशीपूर्वी सोने स्वस्त, चांदीची चमक वाढली, जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | कुटुंब कल्याण विभागाचे कंत्राट मिळाल्याचे भासवून व्यावसायिकाची ३९ लाखांची फसवणुक; बनावट वर्क ऑर्डर तयार करुन करायला लावली गुंतवणुक

 

Related Posts