IMPIMP

Maharashtra Politics | कोकणातील शिवसेनेचे ‘हे’ माजी आमदार करणार भाजपामध्ये प्रवेश, सेनेला आणखी एक धक्का

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis react uddhav thackeray challenge get election loksabha vidhansabha

अलिबाग : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Politics | रायगड जिल्ह्यातील रोहा येथील शिवसेनेचे नेते (Shivsena Leader) आणि
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे पुतणे अवधूत तटकरे (Avadhut Tatkare) हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत
भाजपाचे (BJP) कमळ हाती घेणार आहेत. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीत असताना 2014 साली रायगडच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून
(Shrivardhan Assembly Constituency) निवडून आले होते. तटकरे कुटुंबात उमेदवारीवरून झालेल्या वादानंतर अवधुत तटकरे, त्यांचे वडील
माजी आमदार अनिल तटकरे (Former MLA Anil Tatkare) यांनी 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश (Maharashtra Politics) केला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अवधूत तटकरे यांनी 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यांना शिवसेनेने उमेदवारी न देता विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांना उमेदवारी दिली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. यानंतर अवधूत तटकरे सक्रिय नव्हते. यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने अवधूत तटकरे यांची आणखी राजकीय कोंडी झाली. त्यामुळे शिवसेनेत राजकीय भवितव्य नसल्याची (Maharashtra Politics) जाणीव झाल्याने त्यांनी भाजपशी जवळीक साधली. आता अवधूत तटकरे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

 

श्रीवर्धन मतदारसंघातून कन्या आदिती तटकरेंना (Aditi Tatkare) यांना सुनील तटकरे (Sunil Tatkare) उमेदवारी देणार असल्याचे स्पष्ट झाल्याने सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे यांच्यात वाद झाला होता. यानंतर अवधूत तटकरेंनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता.

 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून अवधूत तटकरे यांचा निसटता विजय मिळवला होता.
या निवडणुकीत अवधूत तटकरे यांना 61,038 मते मिळाली.
तर शिवसेनेचे रवी मुंडे यांना 60961 मते मिळाली होती. 2019 ला अवधूत तटकरे,
वडील माजी आमदार अनिल तटकरे व भाऊ संदीप तटकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
(Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना आणि आता भाजपा असा अवधुत तटकरे यांचा प्रवास होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Maharashtra Politics | setback to shivsena uddhav balasaheb thackerays party former mla avdhoot tatkare will join bjp

 

हे देखील वाचा :

Firing In Islampur | इस्लामपूर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून हवेत गोळीबार, कव्वाली कार्यक्रमात हजारोंच्या उपस्थितीत घडला प्रकार

Chitra Wagh | भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची जयंत पाटलांवर बोचरी टीका, जंतराव…निदान न कळणारी लबाडी तरी करा

Nashik CBI ACB Trap | 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना लष्करातील दोन अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

Rutuja Latke | राजीनामा मंजूर झाल्यानंतर ऋतुजा लटके म्हणाल्या…

 

Related Posts