IMPIMP

Maharashtra Politics | एकनाथ शिंदेंच्या खास आमदाराला शिवसेनेचा शह? कोकणातील माजी आमदाराच्या कन्येला देणार संधी

by nagesh
Maharashtra Political News | all remaining 13 mlas of thackeray faction in touch with cm eknath shinde says uday samant

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Politics | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) फूट पाडत राज्याची सत्ता मिळवली. शिवसेनेत बंडखोरी करत 40 आमदार त्यांच्यासोबत गेले. सध्या शिंदे गट (Shinde Group) सत्तेत असल्याने जोरात असला तरी भविष्यातील निवडणुका या सर्व आमदारांसाठी सोप्या असणार नाहीत. कारण बंडखोरीचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेनेसुद्धा (Maharashtra Politics) आपली व्युहरचना करण्यास सुरूवात केली आहे. एकनाथ शिंदे यांचे जवळचे आमदार भरत गोगावले (MLA Bharatshet Gogawale) यांना शह देण्यासाठी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी दिवंगत माजी आमदार माणिक जगताप (Late former MLA Manik Jagtap) यांच्या कन्या स्नेहल जगताप (Snehal Jagtap) यांना आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेकडून संधी देऊ शकतात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. या मतदार संघात त्यांचे कट्टर विरोधक म्हणून काँग्रेसचे (Congress) माणिकराव जगताप यांना ओळखले जात होते. सुमारे एक वर्षापूर्वी माणिकराव जगताप यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कन्या आणि महाडच्या नगराध्यक्ष (Mahad Mayor) स्नेहल जगताप या मतदार संघातील राजकारण (Maharashtra Politics) पहात आहेत. माणिकराव जगताप हे याच मतदार संघातून एकदा निवडून आले होते, मात्र त्यांचा पराभव करून नंतर गोगावले यांनी या मतदार संघावर वर्चस्व मिळवले. गोगावले सलग तीन वेळा येथून आमदार म्हणून निवडून गेले आहेत.

 

विशेष म्हणजे बदलते राजकारण पाहून नुकतीच स्नेहल जगताप यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दिवंगत काँग्रेस नेते माणिकराव जगताप यांच्या कन्येला शिवसेना संधी देणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर स्नेहल जगताप यांना ’मातोश्री’वर येण्यासाठी चार ते पाच वेळा निमंत्रण
देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात भरत गोगावले यांना शिवसेना कशाप्रकारे शह देणार हे
पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. थोडक्यात गोगावले यांना आगामी निवडणूक सोपी असणार नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Maharashtra Politics | snehal jagtap to join shivsena fight against mla bharat gogawle in mahad

 

हे देखील वाचा :

Gopichand Padalkar | लवकरच राष्ट्रवादीच्या मुंबई आणि बारामती कार्यालयावर भाजपचा झेंडा असेल, गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Eknath Khadse | खडसेंच्या पाठीमागे पुन्हा चौकशीचा फेरा? भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याची पुन्हा होऊ शकते चौकशी

1701 Panhala | “१७०१ पन्हाळा” या ऐतिहासिक चित्रपटासाठी उभारला भव्य सेट

 

Related Posts