IMPIMP

Eknath Shinde | ‘दिघे साहेब असते तर गद्दारी…’ एकनाथ शिंदेंच्या बंडावर आनंद दिघेंच्या पुतण्याची प्रतिक्रिया

by nagesh
Eknath Shinde | late anand dighe nephew kedar dighe comment on shivsena leader eknath shinde stand against cm uddhav thackeray shivsena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनशिवसेना नेते (Shiv Sena Leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजीनामा देण्याची शक्यता असल्याने शिवसेना भवनासमोर (Shiv Sena Bhavan) शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. तसेच पक्षाचे नेतेही पोहचत आहेत. आनंद दिघे (Anand Dighe) यांचे पुतणे केदार दिघे (Nephew Kedar Dighe) हे देखील  शिवसेना भवनाबाहेर उपस्थित असून यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी प्रतिक्रिया दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिवसेना ही कोणत्याही नेत्यामुळे नाही तर सामान्य शिवसैनिकांमुळे उभी राहिली आहे.
पक्षात कोणता नेता राहिला किंवा न राहिला, शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या विचारांचा आधार आहे. गद्दारांना क्षमा नाही, हे दिघे साहेबांचे ब्रीदवाक्य आहे.
त्यामुळे शिवसेना याहून जोमाने पुढे जाईल, असे सांगत केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भूमिकेवर टीका केली.

केदार दिघे पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल खंत आहे.
दिघे साहेबांची शिक्षकवण असलेल्या नेत्याकडून असं होणं अपेक्षित नाही. दिघे साहेब असते तर असं घडलंच नसतं.
त्यांनी संघटनेशी गद्दारी सहनच केली नसती. एकनाथ शिंदे 100 टक्के चुकले आहेत.

 

दिघे साहेबांच्या शिकवणीवर बोलू नये

भाजपासोबत सरकार (BJP Government) स्थापन करावं.
त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री तर स्वत: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील, अशा प्रकारची ऑफर एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाला दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी चालवलं.
हे वृत्त जर खरं असेल तर दिघे साहेबांच्या शिकवणीवर त्यांनी बोलू नये.
दिघे साहेबांनी आपलं उभं आयुष्य शिवसेनेसाठी त्यागलं. अखेरपर्यंत ते शिवसेनेसाठी झटले.
मला वाटतं दिघे साहेबांचा आधार घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडू नये, असं सणसणीत प्रत्युत्तर केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना दिले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Eknath Shinde | late anand dighe nephew kedar dighe comment on shivsena leader eknath shinde stand against cm uddhav thackeray shivsena

 

हे देखील वाचा :

MNS On Uddhav Thackeray | ’21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की, ‘वर्षा’तला शेवटचा दिवस ?’ – मनसे

Shalini Thackeray | ‘पुन्हा एकदा मुख्यमंत्री तोंडावर आपटले, आता कोण एकटे पडले’ – शालिनी ठाकरे

Pune Crime | वडिलांना मारहाण करून पसार झालेल्या मुलाला व जावयाला गुन्हे शाखेकडून अटक

 

Related Posts