IMPIMP

Maharashtra State Women’s Commission | राज्य महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींची जिल्हा पातळीवर होणार सुनावणी

by nagesh
Maharashtra State Women's Commission | complaints women commission heard itself commission blackspot harassme

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra State Women’s Commission | राज्य महिला आयोगाकडे (Maharashtra State Women’s Commission) प्राप्त होणाऱ्या तक्रारींची सुनावणी मुंबईत होत होती. मात्र आता या तक्रारींची सुनावणी जिल्हा पातळीवर संबंधित सर्व यंत्रणांच्या उपस्थितीत घेतली जाणार आहे. याशिवाय छेडछाडीला आळा घालण्यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात ब्लॅक स्पॉट (Black Spot) शोधून त्यावर नियंत्रण ठेवण्यास महिला आयोग प्रयत्न करणार असल्याचे महिला आयोगाच्या नवनियुक्त सदस्या उत्कर्षां रुपवते (Utkarsha Rupvate) व माजी आमदार दीपिका चव्हाण (Deepika Chavan) यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

उत्कर्षा रुपवते आणि दीपिका चव्हाण यांनी गुरुवारी नगरचा (Ahmednagar) दौरा केला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांसमवेत बैठक घेऊन विशाखा समिती व कोरोना एकल महिलांच्या योजनांचा आढावा घेतला तसेच ‘वन स्टॉप सेंटर’ (One Stop Center) (सखी वसतिगृह), जिल्हा सरकारी रुग्णालयातील महिला कक्ष, प्रसूतिगृह, पोलिसांचा भरोसा सेल येथे भेटी देऊन माहिती घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. (Maharashtra State Women’s Commission)

 

त्या म्हणाल्या की, छेडछाडीला रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये पिंक बॉक्स ठेवण्यात येणार आहे. या बॉक्समध्ये होणाऱ्या त्रासाबद्दल विद्यार्थिनी माहिती टाकतील. त्यानंतर हा बॉक्स प्राचार्य व पोलिसांच्या उपस्थितीत उघडला जाईल. त्या तक्रारी संबंधित विभागाकडे देण्यात येतील. कोरोना काळात अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालये सुरू झाल्यानंतर किशोरवयीन मुलींशी संवादाचा कार्यक्रमही घेण्यात येणार असून आयोगाने विभागस्तरावर 6 कार्यालये सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विशाखा समित्या कार्यरत करा –
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळासंदर्भात तक्रारींच्या चौकशीसाठी ज्या आस्थापनांमध्ये 10 पेक्षा अधिक महिला कर्मचारी आहेत त्या ठिकाणी विशाखा समिती स्थापन करा.
त्यानुसार 272 सरकारी कार्यालये, 867 निमसरकारी कार्यालयांमध्ये समितीची स्थापना करण्यात आली आहे.
परंतु, खासगी 731 आस्थापनापैकी 101 अस्थापनात अद्याप समिती स्थापन केलेली नाही.

 

बालविवाह रोखण्यासाठी सतर्क राहा –
गेल्या अडीच वर्षात महिला व बालकल्याण विभागाकडे (Department of Women and Child Welfare) बालविवाहाच्या 69 तक्रारी आल्या होत्या.
त्यातील 35 बालविवाह रोखण्यात आले. जे 23 बालविवाह झाले त्यामध्ये 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अक्षयतृतीयेच्या (दि. 3) मुहूर्तावर बालविवाह मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे यंत्रणांनी सतर्क राहावे. बालविवाह रोखण्यासाठी संबंधित गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची शिफारस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केली असल्याचे रुपवते आणि चव्हाण यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra State Women’s Commission | complaints women commission heard itself commission blackspot harassme

 

हे देखील वाचा :

Spinach For Diabetes Control | शुगर कंट्रोल करण्यासाठी प्रभावी आहे पालक, जाणून घ्या आरोग्य कसे ठेवते चांगले

Ravi Rana – Navneet Rana | राणा दाम्पत्याचा कारागृहातील मुक्काम वाढला

BJP Leader Divya Hagariga Arrest | PSI भरती घोटाळा प्रकरणात CID ने भाजप महिला नेत्याला पुण्यातून केली अटक

 

Related Posts