IMPIMP

Mahesh Tapase | भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करत आहे का? – महेश तपासे

by nagesh
NCP Mahesh Tapase | chandrasekhar bawankule should check his brain first ncps response to criticism of sharad pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सुटकेवर भाष्य केले आहे. भाजप (BJP) राष्ट्रीय विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे, असे महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी म्हंटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारतीय जनता पक्ष आपल्या राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत असल्याची शंका देशातील जनतेच्या मनात आली आहे. बुधवारी संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. यावेळी न्यायालयाने काही गोष्टी निकालात नमूद केल्या आहेत. एकतर संजय राऊत यांना केलेली अटक बेकायदा होती. त्यांना अटक करुन ईडीने (ED) आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. त्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसताना देखील त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले. ईडीच्या कामकाजावर देखील न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ईडी अटक करताना जी कार्यतत्पर्ता दाखविते, तीच तत्पर्ता पुढील कामात दाखवत नाही. या सर्व प्रकारांत ईडी आपल्या मर्जीतील लोकांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणले, असे तपासे यांनी सांगितले.

 

या प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची नावे टाकण्यात आली होती.
ही नावे काँग्रेस आणि पवारांच्या मनात भय निर्माण करण्यासाठी टाकण्यात आली का, असा प्रश्न देखील न्यायालयाने विचारला आहे.
त्यामुळे भाजपने उत्तर द्यावे की, ते केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करत आहेत का?,
असे महेश तपासे (Mahesh Tapase) म्हणाले.

 

Web Title :- Mahesh Tapase Is the BJP using the central investigative agencies to suppress the voices of the opposition?

 

हे देखील वाचा :

Bachchu Kadu | “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अपंगांचे नाथ”; बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यासाठी गौरोद्गार

Chandrashekhar Bawankule | संजय राऊत सुटल्यावर जल्लोष करणे योग्य नाही, त्यांना फक्त जामीन मिळाला आहे – चंद्रशेखर बावनकुळे

Yashomati Thakur | अफवा पसरविणे भाजपचे काम आहे, स्वातंत्र्यांच्या काळात देखील ते तेच करत होते – यशोमती ठाकूर

 

Related Posts