IMPIMP

Bachchu Kadu | “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अपंगांचे नाथ”; बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यासाठी गौरोद्गार

by nagesh
  MLA Bachchu Kadu | bacchu kadu reaction on sanjay raut statement on anandacha shidha

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुख्यमंत्र्यांकडून अंपगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या मागणीला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिली आहे. अपंग मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य असल्याचेही ते म्हणाले. या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे आभारही मानले. एकनाथ शिंदे हे आता खऱ्या अर्थाने अपंगांचे नाथ ठरतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बच्चू कडू (Bachchu Kadu) बोलत होते.

 

बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले “काल आम्ही या मंत्रालयाच्या स्थापनेबाबत बैठक घेतली होती. आता दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. आम्ही हे दिव्य स्वप्न बघितलं होतं. आमच्या २५ वर्षांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. हा ऐतिहासीक आणि क्रांतीकारी निर्णय आहे. भारतात असं मंत्रालय स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे. जागतिक अंपग दिनाच्या (World Disabled Day) दिवशी म्हणजेच ३ डिसेंबर रोजी याची घोषणा होईल.”

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

“या निर्णयाने राज्यभरातील दिव्यांगाना मदत होणार आहे. स्वाधार योजना किंवा गाडगेबाबांच्या नावाने दिव्यांगांना स्वातंत्र घरकूल योजना सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.
मुकबधीरांसाठीही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. येत्या १५ दिवसांत याचा शासन निर्णय होईल.
राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय छोटा निर्णय नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो.
ते खऱ्या अर्थाने आता अपंगांचे नाथ ठरतील. त्यांनी मोठं आणि पुण्यांचे काम केले आहे.
हे मंत्रालय निश्चितच राज्याला एक दिशा देणारे ठरेल,” असेही ते म्हणाले.
“तसेच दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय (Independent Ministry) असेल, पॅराऑलिंपिकच्या (Paralyompics) दृष्टीने एक स्टेडिअम निर्माण होणं गरजेचं आहे.
रोगजार आणि शिक्षणाच्याबाबतीतही अनेक विषय आहेत. ते आता मार्गी लागतील”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

Web Title :- Bachchu Kadu | cm eknath shinde approval ministry of disabled information given by bachu kadu

 

हे देखील वाचा :

Abdul Sattar | ‘मी सुरक्षित’ अब्दुल सत्तारांचे सूचक विधान

Deoli-Wardha Road Accident | देवळी-वर्धा मार्गावर विचित्र अपघात, सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

Yashomati Thakur | अफवा पसरविणे भाजपचे काम आहे, स्वातंत्र्यांच्या काळात देखील ते तेच करत होते – यशोमती ठाकूर

 

Related Posts