IMPIMP

Maratha Reservation | ‘मराठा आरक्षण निवडसूचीतील 1 हजार 64 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देणार’

by nagesh
Pune Pashan Lake | pune pashan talav will closed for couples

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maratha Reservation | राज्य शासनाच्या (State Government) विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या 1 हजार 64 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज सांगितले. मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या बाबतीत (Maratha Reservation) सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil), उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), बंदरे आणि खानिकर्म मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse), राज्य उत्पादन मंत्री शंभूराजे देसाई (Shambhu Raje Desai), विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर (Pravin Darekar), आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinhraje Bhosale), माजी आमदार अर्जुन खोतकर, माजी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले (former MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale), माजी आमदार नरेंद्र पाटील (former MLA Narendra Patil), मराठा मोर्चाचे (Maratha Morcha) आबासाहेब पाटील (Abasaheb Patil), मराठा आरक्षण कार्यकर्ते विनोद पाटील यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) काम करणाऱ्या विविध संघटना आणि मराठा समन्वयक उपस्थित होते.

 

 

एकनाथ शिंदे म्हणाले की, साधारणपणे 2 हजार 185 उमेदवार मराठा आरक्षण घेऊन शासन सेवेत रुजू होणार आहेत. यापैकी 419 उमेदवार शासन सेवेत रुजू झाले आहेत तर 1 हजार 64 उमेदवारांना विविध विभागांमध्ये तात्काळ रुजू करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल. या नियुक्त्या करण्याबाबतचा अध्यादेश तातडीने काढण्यात येईल. उर्वरित 702 उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी, तसेच विभाग यांच्यामार्फत विशेष मोहीम घेण्यात येईल.

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी (Sarathi) या संस्थांना अधिक सक्षम करण्यात येणार

येत्या काळात स्थापन करण्यात येणारी उपसमिती मराठा आरक्षण संदर्भातील सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ (Annasaheb Patil Economic Development Corporation) आणि सारथी या संस्थांना सक्षम करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य शासनाची बाजू अधिक सक्षमपणे मांडण्यासाठी अभ्यास करण्यात येईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सारथी संस्थेला निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री

मराठा आरक्षण संदर्भातील मंत्रिमंडळ उपसमिती सर्व समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल. मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी या संस्थेला राज्य शासनामार्फत निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. महसूलमंत्री विखे- पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबतची स्थिती सक्षमपणे मांडण्यासाठी हे शासन प्रयत्न करेल. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण देण्याबाबत पुढील कार्यवाही करताना यापुढे माझ्यासह मंत्री आणि सचिव सोमवार ते बुधवार दुपारी 4 ते 6 या वेळेत मंत्रालयात समस्या सोडविण्यासाठी उपस्थित राहतील.

 

बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (Chief Secretary Manukumar Srivastava),
सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे (Additional Chief Secretary Nitin Gadre),
महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर (Dr. Nitin Karir),
ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार (Rajesh Kumar), गृह विभागाचे (Home Department)
अपर मुख्य सचिव आनंद लिमये (Anand Limaye), ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare),
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे (Sumant Bhange), विधी व न्याय विभागाचे सतीश वाघोळे (Satish Waghole),
महावितरणचे सचिव विजय सिंघल (Vijay Singhal) यांच्यासह विभागीय आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपले जीवन वाहून घेणारे
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे (Former MLA Vinayak Mete)
यांना बैठकीच्या प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली. याच बैठकीत सारथी संस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maratha Reservation | 1 thousand 64 candidates from the Maratha reservation selection list will be appointed immediately.

 

हे देखील वाचा :

Shivsena Chief Uddhav Thackeray | शिवसेना-संभाजी ब्रिगेड एकत्र ! उद्धव ठाकरेंनी केली घोषणा; म्हणाले -‘राज्यात मोठा इतिहास घडवू’ (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | ‘राज्यात गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिक सक्षम करणार’ – देवेंद्र फडणवीस

Sambhajiraje Chhatrapati | ‘उद्धव ठाकरे चालढकल करत होते, परंतु एकनाथ शिंदेंनी करुन दाखवलं’ (व्हिडिओ)

 

Related Posts