IMPIMP

MLA Bhaskar Jadhav | शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध पुण्यात FIR

by nagesh
Bhaskar Jadhav | bhaskar jadhav reaction on election commission shivsena party case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – MLA Bhaskar Jadhav | सिंधुदुर्ग येथील कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane), माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) व आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्याविरोधात उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी पुण्यात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी योगेश अरुण शिंगटे Yogesh Arun Shingte (वय ३७, रा. निगडी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४४/२२) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शिंगटे हे गुडलक हॉटेलमध्ये बुधवारी दुपारी बसले होते. यावेळी ते त्यांचे फेसबुक (Facebook) अकाऊंट पहात होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Shivsena MLA Vaibhav Naik) यांच्याविरुद्ध चौकशी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांना पोलिसांनी चौकशीला बोलावले आहे. या चौकशीचा निषेध करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयावर शिवसेनेने मोर्चा आयोजित केला होता.

 

या मोर्चामध्ये आमदार भास्कर (MLA Bhaskar Jadhav) जाधव यांनी भाषण केले.
त्यात त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमा मलिन
करण्याच्या हेतूने अर्वाच्छ भोषत वक्तव्य केले.
त्यांचा उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्या असून राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक,
भावनिक तेढ निर्माण करुन त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्यास चिथावणी दिली.
केंद्रीय मंत्री पद हे संविधानिक पद असून या पदाचा अपमान करुन जनमानसात बदनामी करुन सार्वजनिक आगळीक
केल्याने गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक कांबळे (Assistant Police Inspector Kamble) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- MLA Bhaskar Jadhav | a case has been registered against bhaskar jadhav in pune for making a controversial statement about narayan rane

 

हे देखील वाचा :

Pune Crime | चायनीज न मिळाल्याने टोळक्याची तरुणावर कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

Uday Samant | राष्ट्रवादीचे 10-12 आमदार शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात, उदय सामंत यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा खळबळ

Eknath Khadse | शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांची अस्वस्थता बाहेर पडू लागली, एकनाथ खडसेंचा दावा

 

Related Posts