IMPIMP

MLA Rohit Pawar | ‘शरद पवार जे बोलतात ते करून दाखवतात’; रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा

by nagesh
MLA Rohit Pawar | so entire maharashtra will be seen in karnataka now rohit pawar clearly said after sharad pawar on karnatak dispute

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   मंगळवारी पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच
त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला चेतावणीही दिली. पवार म्हणाले, “राज्य सरकारने आपल्या राज्याची अस्मिता टिकवण्यासाठी योग्य ती भूमिका
घेण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने योग्य ती भूमिका घेतली असती तर आज ही वेळ आली नसती, हे प्रकरण येत्या ४८ तासांत
संपलं नाही, तर मला बेळगावात जावं लागेल.” यानंतर शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनीसुद्धा सरकारला
इशारा दिला आहे. शरद पवार जे बोलतात ते करून दाखवतात, असे रोहित पवार (MLA Rohit Pawar) म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यानंतर, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही व्हिडिओ टाकून सरकारला एक इशारा दिला आहे. ते म्हणतात, ‘केंद्रात तुमची सत्ता आहे, कर्नाटकात तुमची सत्ता आहे, महाराष्ट्रात तुमचीच सत्ता आहे. अशावेळी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन जर यापद्धतीचे राजकारण होत असेल, तर हे आम्ही खपवून घेणार नाही. जेव्हा शरद पवार बोललेत, तेव्हा ते महाराष्ट्राचे नागरिक म्हणून बोललेत, यापूर्वी त्यांनी ते करून दाखवलेले आहे. पवारसाहेब बोलतात तेव्हा ते बोलण्यासाठी नाही तर करण्यासाठी असते. जर महाराष्ट्र सरकारने योग्य भूमिका घेतली नाही, तर पवारसाहेब जे बोललेत ते करतील. शरद पवार जेव्हा ते करतील तेव्हा अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात दिसेल,’ असे बोलत आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे.

 

तत्पूर्वी, मंगळवारी बेळगावजवळील हिरेबागेवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना महाराष्ट्राच्या सहा वाहनांना लक्ष्य करत दगडफेक केली, त्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास गेले असता, कर्नाटक प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतले, त्यामुळे परिस्थिती चिघळली. संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनांमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, खुद्द राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी ४८ तासांचा अल्टिमेटच दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MLA Rohit Pawar | so entire maharashtra will be seen in karnataka now rohit pawar clearly said after sharad pawar on karnatak dispute

 

हे देखील वाचा :

Shambhuraj Desai On Sanjay Raut | ‘संजय राऊतांना तुरुंगाबाहेरील वातावरण मानवत नाही; त्यांना पुन्हा आरामाची वेळ येऊ नये’

ShahRukh Khan | शाहरुख खानचा मुलगा आर्यन बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज; अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करणार काम

Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | मुख्यमंत्री शिंदे यांनी उरुळी देवाची-फुरसुंगीचे केले राजकीय ‘ऑपरेशन’ ! सर्वसामान्य स्थानिक नागरिकांना आयुष्यभर सोसाव्या लागणार वेदना?

 

Related Posts