IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | कर्नाटकात कोणाला मतदान करायचं? राज ठाकरेंनी मतदारांना केलं आवाहन

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | raj-thackeray-letter-to-karnatak-maharashtra-border-voters-says-vote-to-marathi-candidates

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Elections) 10 मे रोजी मतदान होणार असून 13
मे रोजी निकाल लागणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते मराठी उमेदवारांच्या (Marathi Candidates)
प्रचारासाठी कर्नाटकात गेले आहेत. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
सीमाभागातील मतदारांना (Voters) आवाहन केलं आहे. मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा असे आवाहन राज ठाकरे
(MNS Chief Raj Thackeray) यांनी सीमाभागातील मतदारांना केलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या 10 मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी.

 

 

तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा (Kannada Language) आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही, असा इशाराही राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी दिला आहे.

 

मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून (Government of Karnataka) खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो.

 

कर्नाटकातल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल,
मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत. ह्यासाठी सीमाभागातील लोकांना 10 मे ला संधी आहे.
मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे.
ही संधी दवडू नका, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  MNS Chief Raj Thackeray | raj-thackeray-letter-to-karnatak-maharashtra-border-voters-says-vote-to-marathi-candidates

 

हे देखील वाचा :

IPS Mahesh Patil – SP Sunil Kadasne | आयपीएस अधिकारी महेश पाटील यांची ठाण्यात तर पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांची बुलढाणा येथे बदली

Maharashtra Politics News | ‘तुमचं जेवढं आयुष्य, तेवढं शरद पवार यांचे राजकारण’, सामनाच्या अग्रलेखावरुन राष्ट्रवादीनं संजय राऊतांना सुनावलं

Maharashtra Politics News | सामनाच्या अग्रलेखावरून मविआत बिघाडी, राष्ट्रवादीनं आघाडीतून बाहेर पडावं का? छगन भुजबळांचा राऊतांना संतप्त सवाल

 

Related Posts