IMPIMP

MLA Sunil Tingre | अखेर पोरवाल रस्त्याच्या पर्यायी रस्त्यांचा मार्ग मोक़ळा, मार्थोपोलिस शाळेची जागा देण्यास मंजुरी; आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

by nagesh
MLA Sunil Tingre | Finally clearing the way for alternative roads to Porwal Road, approval to give the site of Mar Theophilus School; Success to MLA Sunil Tingre's efforts

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन MLA Sunil Tingre | वाहतुक कोंडीचा (Traffic Jam In Pune) प्रश्न सोडविण्यासाठी पोरवाल रस्त्याला (Porwal Road) आखण्यात आलेल्या समातंर 24 मीटर रुंदीच्या नविन पर्यायी रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या रस्त्यासाठी मार्थोपोलिस (Mar Theophilus School) शाळेने जागा देण्यास बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता या रस्त्याचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

धानोरी-लोहगाव येथील पोरवाल रस्ता परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहिले आहेत. या भागाला जाणारा पोरवाल रस्ता हा एकमेव रस्ता असल्याने वाहतुक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली होती. त्यावर मार्ग काढण्यासाठी स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांनी पोरवाल रस्त्याला समांतर असा कलम 205 अंतर्गत पर्यायी सुधारित रस्त्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला होता. मात्र, त्यावर कार्यवाही होत नसल्याने आमदार टिंगरे यांनी मार्च महिन्यात उपोषणाचा इशारा दिला होता.

 

 

त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने धानोरी स. न. 12, 14, 15 व 17 मधून 24 मीटर रुंदीचा रस्ता कलम 205 अन्वये रस्ता आखण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा व मुख्यसभेत तातडीने मंजुर करण्यात आला होता.
मात्र, पर्यायी रस्त्यांवर असलेल्या मार्थोपोलिस या शाळेच्या परिसरातील जागा मिळत नसल्याने या रस्त्याचे काम
रखडले होते. दरम्यान गत महिन्यात आमदार टिंगरे यांनी या शाळेचे पदाधिकारी व आयुक्त यांची एकत्रित बैठक घेऊन जागा हस्तांतरीत करण्याबाबत चर्चा केली होती.
त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने शाळेला पत्र पाठविले होते.
त्यावर शाळेने रस्त्यासाठी आवश्यक असलेली जागा देण्यास बुधवारी मंजुरी दिली असल्याचे आमदार टिंगरे
यांनी सांगितले. त्यामुळे आता या नविन रस्त्यांच्या कामाला तात्काळ सुरवात होऊन पोरवाल रस्त्यांच्या
वाहतुक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. (MLA Sunil Tingre)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या रस्त्यांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मी विधानसभा निवडणूकीत दिले होते.
त्यानुसार गेल्या तीन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
अखेर अनेक अडथळ्यांची शर्यंत पार केल्यानंतर रस्त्यांचा मार्ग सुकर होत असून माझीही आश्वासनपुर्ती होत आहे.
– सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.

 

 

Web Title :-  MLA Sunil Tingre | Finally clearing the way for alternative roads to Porwal Road, approval to give the site of Mar Theophilus School; Success to MLA Sunil Tingre’s efforts

 

हे देखील वाचा :

T20 World Cup 2022 | विराट कोहलीने रचला विराट विक्रम! श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेला मागे सोडत रचला विश्वविक्रम

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात होणार तुफान राडा!

Nana Patole | ‘देवेंद्र फडणवीस ‘सुपरमॅन’, मात्र आता…’, नाना पटोलेंची खोचक टीका

Priyanka Chopra | भारतात येताच प्रियंकाने मोरबी दुर्घटनेवर शेअर केली पोस्ट, म्हणाली कि….

 

Related Posts