IMPIMP

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात होणार तुफान राडा!

by nagesh
Bigg Boss Marathi 4 | bigg boss marathi todays episode video viral

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : बिग बॉस (Bigg Boss Marathi 4) चा प्रत्येक सीजन हा चर्चेचा विषय असतो. यंदाचा बिग बॉस सीजन 4 देखील जोरात सुरु आहे. कधी भांडण कधी वाद यांनी रंगलेला बिग बॉस 4 (Bigg Boss Marathi 4) देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. हळूहळू स्पर्धकांचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येत आहे. गेल्याच आठवड्यात योगेश जाधव (Yogesh Jadhav) बाहेर पडताच त्यांनी किरण मानेंवर (Kiran Mane) निशाणा साधला होता. यावरून घरात जोरदार वाद पाहायला मिळाले. यानंतर आता ‘खुला करायचा राडा’ (Khula Karaycha Rada) हे कार्य सदस्यांना सोपवण्यात आले होते. त्याचाच प्रोमो सध्या जोरात वायरल होत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

समोर आलेल्या प्रोमो मध्ये दिसत आहे की, खुला करायचा राडा या कार्यामध्ये सदस्य मिरचीची धुरी, पाणी, तेल या सगळ्याचा वापर करताना दिसत आहेत. या टास्कमध्ये आज घरात तेजस्विनी (Tejaswini) आणि अमृता धोंगडे (Amrita Dhongde) नवी खेळी करताना दिसणार आहेत. टास्कसाठी दोन्ही टीम आपापल्या रणनीती आखत आहेत.

 

 

आता या कार्यानंतर कोणता नवीन वाद निर्माण होईल, कोणती टीम हे कार्य जिंकेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
तर त्याचबरोबर वाइल्ड कार्ड एंट्री (Wild card entry) म्हणून स्नेहलता वसईकर (Snehalata Vasaikar)
यांची खेळी पाहण्यास देखील प्रेक्षकांना खूपच मज्जा येणार आहे हे मात्र नक्की.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bigg Boss Marathi 4 | bigg boss marathi todays episode video viral

 

हे देखील वाचा :

T20 World Cup 2022 | विराट कोहलीने रचला विराट विक्रम! श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेला मागे सोडत रचला विश्वविक्रम

Nana Patole | ‘देवेंद्र फडणवीस ‘सुपरमॅन’, मात्र आता…’, नाना पटोलेंची खोचक टीका

Chandrashekhar Bawankule | राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पावरुन बावनकुळेंचा महाविकास आघाडीला इशारा, म्हणाले- ‘यापुढे खोटारडेपणा केला, तर…’

 

Related Posts