IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | ‘…तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार’; भीम आर्मीचा इशारा

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | bhim army challenges raj thackeray aurangabad rally follow police condition

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. राज यांच्या सभेला प्रशासनाने मात्र काही अटी घातल्या असून त्या अटींचं पालन करावं लागणार आहे. मात्र अशातच भीम आर्मीने (Bhim Army) ही सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. याबाबत भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे (Ashok Kamble) यांनी माहिती दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1 तारखेला राज ठाकरेंची (MNS Chief Raj Thackeray) सभा होणार आहे मात्र ही सभा उधळून लावण्याच्या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत. आम्हाला कळलं की राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे मात्र त्यांनी जर नियमांंचं उल्लंघन केलं तर सभेमध्ये महापुरूषांच्या नावाच्या घोषणा ऐकायला मिळतील. आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही मात्र जो संविधानाच्या (Constitution) विरोधात वागेल त्याच्या विरोधात आम्ही असल्याचं अशोक कांबळे म्हणाले.

 

सभेला परवानगी मिळाल्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी, सर्वांना मनापासून आनंद झाल्याचं म्हटलं आहे. पोलीस आयुक्तांनी ज्या काही अटी घातल्या आहेत त्याचं नक्कीच पालन केलं जाईल. कायदा – सुव्यवस्था राखणं तुमच्याप्रमाणे आमचंही कर्तव्य आहे आणि ते नक्कीच पाळलं जाणार असल्याचं नांदगावकर म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, राज ठाकरेंच्या या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं नाहीतर संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यांवरून (Loudspeakers) घेतलेल्या भूमिकेमुळे ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | bhim army challenges raj thackeray aurangabad rally follow police condition

 

हे देखील वाचा :

Salt Intake | डाएटमध्ये कमी कराल मीठाचे सेवन तर शरीराला होतील हे 7 फायदे!

Ajit Pawar on Navneet Rana | ‘…हे तपासण्याचं अजुन तरी आपल्याकडे यंत्र नाही’; अजित पवारांचा नवनीत राणांना टोला !

Summer Detoxification | उन्हाळ्यात बॉडी हेल्दी ठेवणे आणि डिटॉक्सफिकेशनसाठी अशाप्रकारचा डाएट करा फॉलो

 

Related Posts