IMPIMP

मोदी सरकार 100 मालमत्तांची विक्री करण्याच्या तयारीत, एअर इंडिया-BPCL चा समावेश ?

by sikandershaikh
pm narendra-modi

नवी दिल्ली : लोककल्याणावर सरकारने भर दिला पाहिजे. सरकारचे व्यवसाय करणे हे काम नाही परंतु अशा बऱ्याच सरकारकडे मालमत्ता आहेत की ज्यांचा पूर्ण उपयोग झालेला नाही पडून आहेत अशा १०० मालमत्ता बाजारात आणून २.५ लाख कोटी रुपये उभे केले जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवर आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या (modi government) निर्गुंतवणूक योजनेबाबत चर्चा केली.

फेब्रुवारीत झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी निर्गुंतवणुकीद्वारे सरकारने १.७५ लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सरकार (modi government) ज्या पद्धतीने पावले उचलत आहे त्यावरून असे मानण्यात येत आहे की, एअर इंडिया आणि बीपीसीएलसाठी निर्गुंतवणुकीची योजना जुलै ते ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या तयारीत सरकार आहे. या वर्षात उच्च विकासाच्या मार्गावर भारताला नेण्यासाठी एक स्पष्ट रुपरेषा तयार करण्यात आली असल्याचे मोदी म्हणाले. याचबरोबर, सार्वजनिक क्षेत्रातील बर्‍याच उपक्रमांचे नुकसान होत असून करदात्यांच्या पैशातून अनेकांना मदत केली जात आहे. केवळ वारसा मिळाला म्हणून सरकारी कंपन्या चालवल्या जाऊ नयेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

याशिवाय, मालमत्ता विक्री आणि आधुनिकीकरणावर सरकारने लक्ष केंद्रित केले असून खासगी क्षेत्रातून कौशल्य येते, रोजगार उपलब्ध होतात.
खासगीकरण आणि मालमत्ता विक्रीतून येणारे पैसे हे जनतेसाठी खर्च केले जातील.
दरम्यान, सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या योजनेवर कोरोना विषाणूच्या साथीमुळे परिणाम झाला.
मीडिया रिपोर्टनुसार, येत्या दोन महिन्यांत एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला सरकार निविदा भरण्यास बोली देऊ शकेल.
ही निर्गुंतवणूक जुलै-ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याची सरकारची तयारी आहे.
भारतीय नागरिकांचे सशक्तीकरण होण्यास खासगीकरण आणि मालमत्ता विक्रीच्या निर्णयामुळे मदत होईल, असा सरकारला विश्वास आहे.

राष्ट्रवादीला मिळणाऱ्या देणगीत वर्षभरात मोठी वाढ ! भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं दिले तब्बल 5 कोटी ?

Related Posts