IMPIMP

Mohit Kamboj | डॉ. लांबेंचं कनेक्शन नेमकं कोणासोबत?, आता भाजपने शरद पवारांचा फोटो शेअर करत केला ‘हा’ दावा !

by nagesh
Mohit Kamboj | dr mudassir lambe connection with whom mohit kamboj bharatiya shared photo with sharad pawar and makes big claim

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mohit Kamboj | राज्यात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Denvendra Fadnavis) एकापाठोपाठ बॉम्ब फोडत आहेत. सोमवारी फडणवीसांनी आणखी एक पेन ड्राईव्ह (Pen Drive) सभागृहात सादर करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld Don Dawood Ibrahim) यांची दोन माणसे वक्फ बोर्डात नियुक्त करण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्यातील संवाद फडणवीसांनी सभागृहात ऐकवत महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका दिला. मात्र अशातच भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी संभाषणामधील डॉ. मुदाससीर लांबे (Dr. Mudassir Lambe) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो शेअर केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा संभाषणातील दोन व्यक्तींमधील संभाषण सादर केल्यानंतर मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering Case) प्रकरणात तुरूंगात असलेले अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची मुलगी सना मलिक शेख (Sana Malik Sheikh) यांनी ट्विट केलं होतं. त्यामध्ये डॉ. लांबे यांची वक्फ बोर्डावर (Waqf Board Maharashtra) 2019 साली म्हणजेच फडणवीस मुख्यमंत्री असताना नियुक्ती झाली असल्याचं सना मलिक शेख यांनी म्हटलं होतं. भाजपने राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

गेल्या 15 वर्षांपासून डॉ. लांबे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत.
इतकंच नाही तर 2011 मध्ये त्यांनी वॉर्ड क्रमांक 181 माहिम येथून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक Brihanmumbai Municipal Corporation Election (BMC Election) लढवली होती
तसेच त्यांचे राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचा दावाही मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपमध्ये (BJP) यावरून आरोप -प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
मोहित कंबोज यांनी शरद पवार यांचा फोटो शेअर केल्यामुळे संघर्ष पाहायला मिळत आहे.
त्यामुळे लांबेंचं कनेक्शन नेमकं कोनासोबत यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

 

Web Title :- Mohit Kamboj | dr mudassir lambe connection with whom mohit kamboj bharatiya shared photo with sharad pawar and makes big claim

 

हे देखील वाचा :

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! ‘कोरोना’च्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या पाचशेच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | HUF India कंपनीची व्यवस्थापकीय संचालकांकडून 139 कोटींची फसवणूक; सुनिल कुमार गर्ग, निखिल अगरवाल, संदिप वाण, विशाल टमोटीया यांच्यावर FIR

Hearing Loss | तुमची ऐकण्याची क्षमता प्रभावित करू शकतात ‘या’ 4 सवयी, जाणून घ्या उपाय

 

Related Posts