IMPIMP

Monsoon 2022 Update | गुड न्यूज ! यावर्षी मान्सून येणार 5 दिवस आधीच, हवामान विभागाने वर्तवला अंदाज; महाराष्ट्रात 20 मेनंतर पावसाचा इशारा

by nagesh
Maharashtra Monsoon Update | monsoon active over maharashtra state severe weather alerts for 5 days by imd heavy rf alerts cont including mumbai thane maharashtra news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMonsoon 2022 Update | पावसाचे आगमन हा सर्वांसाठीच उत्सुकतेचा विषय असतो. शेतकरी असो की सर्वसामान्य माणूस, दरवर्षी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता पावसाच्या आगमनाबाबत एक आनंदाची बातमी आली. कारण मान्सून वेगाने वाटचाल करत असून तो राज्यात लवकर येईल, असा अंदाज हवामान विभागाने Indian Meteorological Department (IMD) वर्तवला आहे. (Monsoon 2022 Update)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, रविवारी अंदमानात मोसमी पाऊस दाखल होऊ शकतो. यावर्षी पाच दिवस आधीच मान्सून अंदमानात पोहोचू शकतो. बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ शांत होताच कमी दाबाचे पट्टे तयार झाले असून यामुळे मान्सूनचा मार्ग सोपा झाला आहे.

राज्यात मान्सूनचे आगमन 27 मे ते 2 जूनदरम्यान
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात 15 मे रोजीच मान्सूनचे आगमन होऊ शकते. बंगालच्या उपसागरात बुधवारी संध्याकाळी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आंध्र प्रदेश आणि रायलसीमाच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी सुरू आहे. (Monsoon 2022 Update)

या वार्‍यांचा वेग किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किलोमीटर आहे. या सर्व घडामोडींमुळे मान्सूनचे आगमन 5 दिवस आधीच होईल.
मान्सून केरळमध्ये 20 ते 26 मेपर्यंत दाखल होईल.
तसेच तळकोकणात मान्सून 27 मे ते 2 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यात 20 मेपर्यंत पावसाचा इशारा
20 मे पासून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 20 मे ते 26 मेपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला.
हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात 27 जूननंतरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात आर्द्रता वाढल्याने हवामान ढगाळ राहील. यामुळे राज्यात तापमान कमी राहू शकते.

Web Title :- Monsoon 2022 Update | monsoon 2022 update will arrive early 5 days says imd

हे देखील वाचा :

How To Live A Long Life | दीर्घायुष्य पाहिजे तर सेवन करा ‘या’ गोष्टी, शास्त्रज्ञांनी सांगितला निरोगी जीवनाचा फार्म्युला; जाणून घ्या

Pune Crime | पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू, जिलेटीनच्या कांड्या आढळल्या? स्फोटके नसून फटाक्यासारख्या वस्तू असल्याचा रेल्वे पोलिसांचा दावा

Sanjeevani Karandikar | बाळासाहेब ठाकरे यांची लहान बहीण संजीवनी करंदीकर यांचे पुण्यात निधन; अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता

Related Posts