IMPIMP

MP Navneet Rana | नवनीत राणांच्या अडचणीत वाढ! अटक वॉरंटची अंमलबजावणी करा; मुंबई न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

by nagesh
Navneet Rana | shivdi court navneet rana father harbhajan singh was declared fugitive by the court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे वडील हरभजन रामसिंग यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र (Fake Caste Certificate) सादर केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश विशेष न्यायदंडाधिकारी न्यायालयाने (Special Magistrate Court) दिले आहेत. नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी त्यांच्या दोषमुक्तेसाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत शिवडी न्यायालयाचे (Shivdi Court) आदेश कायम ठेवले. शिवडी न्यायालयाने राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट (Non-Bailable Arrest Warrant) जारी केले होते. त्यामुळे त्याची अमंलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

 

विशेष न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. आय. मोकाशी (Justice P.I. Mokashi) यांनी हे आदेश दिले आहेत. पोलिसांना 28 डिसेंबर पर्यंत राणा यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 डिसेंबर रोजी होणार आहे. राणा (MP Navneet Rana) यांनी याप्रकरणी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण सत्र न्यायालयाने देखील त्यांच्या अर्जावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. 28 तारेखपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेशच न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

खासदार राणा संसद अधिवेशनामुळे दिल्लीला आहेत. त्यामुळे त्या सुनावणीस हजर राहू शकल्या नाहीत.
त्यावर न्यायमूर्तींना नाराजी व्यक्त केली. सिंग आणि राणा यांच्या विरोधात लवकरच वॉरंटची अंमलबजावणी
केली जाईल, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. राणा यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून बनावट जात प्रमाणपत्र सादर करत निवडणूक लढवली होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना बनावट कागदपत्रे देऊन खोटे जातप्रमाणपत्र बनवून घेतले होते. राणा यांचा जातीचा दाखला देखील जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून रद्द करण्यात आला आहे. राणा यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील न्यायालयाच्या निकालावर स्थगिती दिली आहे.

 

Web Title :- MP Navneet Rana | mumbai court orders city police to execute nbws against mp navneet rana

 

हे देखील वाचा :

Dhangar Reservation | आदिवासी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण नको – राजेंद्र गावित

Ajit Pawar | रवी राणा यांच्या उद्धव ठाकरेंवरील आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया (VIDEO)

Winter Session -2022 | ‘लाज नसलेल्या माणसाला…’ जितेंद्र आव्हाडांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना अप्रत्यक्ष टोला

 

Related Posts