IMPIMP

MP Shrikant Shinde | ‘आम्ही पातळी सोडली नाही आणि…’, संजय राऊतांच्या ‘त्या’ कृतीवर खा. श्रीकांत शिंदेंचा पलटवार

by nagesh
MP Shrikant Shinde | questions about sanjay rauts actions mp shrikant shindes reply

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपवर (BJP) करत असलेल्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यातच काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदेबाबत (MP Shrikant Shinde) विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी थुंकून आपला राग व्यक्त केला होता. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी महाराष्ट्राचे संस्कार आणि राजकीय संस्कृती सांगत राऊतांवर निशाणा साधला होता. यावर धरणाचा उल्लेख करत संजय राऊतांनी पवार यांच्यावर पलटवार केला होता. दोघांमध्ये टीका टिप्पणी सुरु असताना आता स्वत: खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.

माझ्यावर टीका करा, पण माझे उत्तर कामातून असेल, आम्ही पातळी कधी सोडलेली नाही आणि सोडणार देखील नाही. महाराष्ट्राची संस्कृती (Maharashtra Culture) बिघडवण्याचे काम ते करतात अशी टीका श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी केली. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राला वेगळा इतिहास आहे. वेगळी संस्कृती आहे, जिथे विरोधक देखील एकमेकांचे नाव आदराने घेतात. आज सगळ्या पातळ्या सोडून सकाळपासून रात्री झोपेपर्यंत शिव्या देण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्राची संस्कृती दूषित करण्याचे काम सुरु असल्याची टीका शिंदे यांनी केली.

बाकीचे राज्य, युवक आपल्याकडे कशाप्रकारे बघत आहेत. राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन लोकांचा कसा होत आहे.
हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. इथून मागे देखील सत्तांतरे झाली. परंतु गेल्या दहा महिन्यापासून शिवसेना (Shivsena)
भाजपची सत्ता आल्यापासून पातळी सोडून हीन दर्जाचे राजकारण महाराष्ट्रत केले जात आहे.
महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम सध्या सुरु आहे, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतांच्या कृतीवर पलटवार केला.

Web Title : MP Shrikant Shinde | questions about sanjay rauts actions mp shrikant shindes reply

Related Posts