IMPIMP

MP Supriya Sule | सुप्रिया सुळेचा मोठा दावा, म्हणाल्या – ’15 दिवसांत दिल्ली आणि राज्यात दोन राजकीय भूकंप होणार’

by nagesh
MP Supriya Sule | in next 15 days there will be to political explosions in delhi and maharashtra said supriya sule

मुंबई :   सरकारसत्ता ऑनलाईन- महाराष्ट्रात राजकीय (Maharashtra Political News) चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार
(Ajit Pawar) भाजपमध्ये (BJP) जाण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा होत आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya
Sule) यांनी मोठा दावा केला आहे. येत्या 15 दिवसांत दोन राजकीय स्फोट होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एक स्फोट दिल्लीत आणि दुसरा
महाराष्ट्रात होईल असे सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी सांगितले. एका हिंदी वृत्तवाहीनीने वृत्त दिले आहे.

 

सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे अंदाज वर्तवले जात आहे. सुप्रिया सुळेंना जेव्हा हे विचारण्यात
आलं की अजित पवार कुठे आहेत? तेव्हा त्या म्हणाल्या, तुम्ही त्यांच्या मागे जा, तुम्हाला समजेल ते कुठे आहेत. अनेक समस्या आहेत, राज्यात कामं होत
नाहीत त्यामुळे काही कार्यक्रम रद्द करुन अजित पवार गेले होते. एक कार्य़क्रम रद्द केला म्हणून काहीही होत नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार भाजपमध्ये जाणार का? असे विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्याकडे गॉसिपसाठी वेळ नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून
माझ्याकडे खूप काम आहे. मला याविषयीची काहीही माहिती नाही. अजितदादा हे मेहनत करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या विषयी चर्चा होत आहेत
असंही त्या म्हणाल्या.

 

सुप्रिया सुळे यांनी यावेळी अजित पवार नाराज नसल्याचे सांगितले. संभाजी नगरमध्ये महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सभा झाली. त्या
ठिकाणी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाषण केले नाही. याचा अर्थ ते नाराज आहेत असा होत नाही. नागपूरमध्ये झालेल्या सभेत राष्ट्रवादीच्या दोन
नेत्यांची भाषण झाली. त्याठिकाणी अजित पवार बोलले नाहीत, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

 

 

Web Title :- MP Supriya Sule | in next 15 days there will be to political explosions in delhi and maharashtra said supriya sule

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अजित पवारांनी ट्विटर आणि Facebook वरुन हटवलं राष्ट्रवादीचे चिन्ह

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलीस स्टेशन – आई मारते म्हणून तीन लहान मुले घरातून गेली निघून; चार तासांच्या प्रयत्नानंतर कॅम्पात सापडली सुखरुप

NCP Chief Sharad Pawar | अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले- ‘ही चर्चा…’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – पांडवनगरमध्ये गुंडांचा राडा; टोळीच्या वर्चस्वातून तरुणावर जीवघेणा हल्ला करुन 4 चारचाकी, 14 दुचाकींची तोडफोड

 

Related Posts