IMPIMP

MP Udayanraje Bhosale | राज्यपालांना अडीच वर्षात शिवाजी महाराज समजले नाहीत, त्यांना तात्काळ पदमुक्त करा; उदयनराजेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

by nagesh
MP Udayanraje Bhosale | mp udyanraje bhosale letter to pm modi over dismiss governor bhagatsingh koshyari controversial statemement on shivaji maharaj

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन महारष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यांना लवकरात लवकर पदमुक्त करावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यातच आता छत्रपती शिवरायांचे तेरावे वशंज खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यपाल कोश्यारींना पदावरुन हटवा, अशी मागी करणारं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी लिहिलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रात अडीच वर्षे कारकीर्द होऊन ही त्यांना शिवाजी महाराज समजले नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद असताना ते दिवसेंदिवस आपल्या पदाची प्रतिष्ठा रसातळाला नेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करुन सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्य पाहिली असता त्यांचे आजपर्यंतचे वर्तन अशोभनीय आहे. त्यांना तात्काळ पदमुक्त करा, अशी मागणी करणारं पत्र उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी लिहिलं आहे.

उदयनराजेंनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले…

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत, महाराष्ट्र तर त्यांना अस्मिता मानून आपली वाटचाल करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. तंजावर पासून अफगाणिस्तानपर्यंत स्वराज्याचा विस्तार केला. त्याचबरोबर महाराजांनी समाजामध्ये सर्वधर्मसमभावाची भावना रुजवली. तोच विचार आपण पुढे नेत आहोत. गेल्या काही वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता वापरुन त्यांच्या नावावर राजकारण केले जात आहे, हे अभिमानास्पद आहे. मात्र काही व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करुन सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब आपल्या देशाच्या अस्मितेसाठी अतिशय दुर्दैवी आहे. याकडे अतिशय गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.

दि. 20 नोव्हेंबर 2022 रोजी आलेल्या दोन वक्तव्यांनी महाराष्ट्रातील जनता संतप्त झाली आहे.
त्यातील पहिले वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आहे आणि दुसरे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचे आहे. त्यांची ही वक्तव्ये निषेधार्ह आहेत. मी त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान तर केलाच आहे.
पण यापुर्वीही त्यांनी, समर्थ रामदास गुरु होते म्हणून महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले.
रामदास नसते तर ते शक्य झाले नसते, या आशयाचे विधान केलं होतं.
शिवाजी महाराजांचे महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापुर्वी महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबत अपमानास्पद
वक्तव्य केले होते. ही सर्व वक्तव्ये त्यांनी जाहीर कार्यक्रमात केली आहेत.
त्याचा जनमानसांतून निषेध होऊनही ते स्वत: बदलायला तयार नाही. ही बाब दुर्दैवी आहे.
राज्यपाल हे घटनात्मक पद असतानादेखील दिवसेंदिवस आपल्या पदाची प्रतिष्ठा रसातळाला नेत आहेत.
राज्यपालांनी मात्र अशोभनीय वर्तन केले आहे, हे खेदाने नमूद करावे लागत आहे.

त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हे इतिहास संशोधक नाहीत तरीही त्यांनी छत्रपती शिवाजी
महाराज यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केलं आहे. त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांना
तातडीने पदावरुन दूर करावे, अशी आमची मागणी आहे. आपण यावर योग्य ती कार्यावाही कराल याची
मला खात्री आहे.

Web Title :- MP Udayanraje Bhosale | mp udyanraje bhosale letter to pm modi over dismiss governor bhagatsingh koshyari controversial statemement on shivaji maharaj

हे देखील वाचा :

Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | ‘एकीकडे गुजरात उद्योग आणि कर्नाटक गावं पळवत असताना मुख्यमंत्री मात्र तंत्रमंत्रात अडकले’ – संजय राऊत

Mahavitaran Employee – Court News | वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीस 3 वर्षे सश्रम कारावास

Raj Thackeray | राज ठाकरे करणार कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा दौरा; मनसेने केला तपशील जाहीर

Related Posts