IMPIMP

Pune Crime | मेफेड्रॉन बाळगल्याप्रकरणी एकाला अटक, 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime News | Accused who threatened to kill family of chartered accountant and demanded extortion of 30 lakhs arrested by crime branch

तळेगाव दाभाडे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मेफेड्रॉन अंमली (Mephedrone Drug) पदार्थ विक्रिसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी ठाणे (Thane) येथील एका व्यक्तीला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 32 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) ही कारवाई मंगळवारी (दि.5) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास भंडारा डोंगराकडे  जाणाऱ्या तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) कमानीजवळ रस्त्याच्या (Pune Crime) कडेला केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नदीम इनायत पटेल Nadeem Inayat Patel (वय-33 रा. रशिद कंपाऊंड, सैनिकनगर, फ्लॅट नं.7, मुंब्रा-Mumbra, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या (Crime Branch) शस्त्र विरोधी पथकाचे (Anti-Arms Squad) पोलीस हवालदार खेमा वडेकर Police Constable Khema Wadekar (वय-37) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Talegaon MIDC Police Station) फिर्याद दिली.(Pune Crime)

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुदवडी गावच्या (Sudwadi Village) हद्दीत भंडारा डोंगराकडे जाणाऱ्या तुकाराम महाराज कमानीच्या जवळ रोडच्या कडेला एक सेलोरो Celerio (एमएच 04 के.एल.8762) गाडी संशयास्पद आढळून आली. पोलिसांनी गाडीमधील आरोपी पटेल याची झडती घेतली असता त्याच्याकडे 27 लाख 20 हजार रुपये किमतीचे 272 ग्रॅम मेफेड्रॉन (MD) हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीने मेफेड्रॉन विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे समोर आले. पोलिसांनी कार, मेफेड्रॉन, दोन मोबाईल असा एकूण 32 लाख 61 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | One arrested for possession of mephedrone, Rs 32 lakh seized

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut on Kirit Somaiya | ‘किरीट सोमय्या महाराष्ट्राला लागलेली कीड, ही कीड मीच संपवणार’

Green Sprouted And Shrunken Potatoes | ‘या’ रंगाचे बटाटे अजिबात खाऊ नका, अन्यथा कॅन्सरचा धोका

MNS on Sanjay Raut | ‘ईडीने थेट राष्ट्रवादीच्याच भोंग्यावर कारवाई केली’; मनसेचा संजय राऊतांना चिमटा

Anil Kumble-Virat Kohli | ‘…म्हणून विराट कोहलीला कुंबळे प्रशिक्षक म्हणून नको होते’; तब्बल 5 वर्षांनी समोर आलं खरं कारण

 

Related Posts