IMPIMP

Mumbai Crime | फटाके फोडण्याच्या वादातून 3 अल्पवयीन मुलांनी केला तरुणाचा खुन, गोवंडी परिसरातील धक्कादायक घटना

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Mumbai Crime | काचेच्या बॉटलमध्ये फटाके फोडण्यास विरोध केल्याने तीन अल्पवयीन मुलांनी 21 वर्षाच्या तरुणाचा खुन (Murder In Mumbai) केल्याची घटना गोवंडी भागात घडली आहे. ही घटना (Mumbai Crime) रविवारी (दि. 24 ऑक्टोबर) रोजी गोवंडीच्या नटवर पारिया कंम्पाऊंड मधील म्हाडा वसाहतीत इमारत क्रमांक 15 येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी (Mumbai Police) तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सोमवारी (दि. 24 ऑक्टोबर) रोजी गोवंडीच्या नटवर पारिया कंम्पाऊंड मधील म्हाडा वसाहतीत इमारत क्रमांक 15 च्या कोपऱ्यात 3 अल्पवयीन मुले काचेच्या बॉटलमध्ये रॉकेट उडवत होते. यावेळी त्यांना सुनील उर्फ शंकर चंद्रशेखर नायडू Sunil Chandrashekar Naidu (वय 21) याने काचेच्या बॉटलमध्ये फटाके (रॉकेट) उडवू नका, असे सांगितले. याचा राग तिघांना आला आणि त्यांच्यात शाब्दिक (Mumbai Crime) वाद झाले. या वादाचे रुपांतर मारामारीत होऊन तिघांपैकी एकाने चाकू काढत तो सुनीलच्या मानेत घुसवला आणि तिथून पळ काढला.
सुनील जखमी अवस्थेत त्या मुलांच्या मागे लागला. पण ते सापडले नाहीत.

 

सुनीलच्या मानेतून रक्तस्त्राव सुरु होता. त्यावेळी त्याला त्याच्या नातेवाईकांनी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात
(Rajawadi Hospital) नेले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शिवाजी नगर (Shivaji Nagar Police) पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांवरही आयपीसी 302, 34 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा
(Maharashtra Police Act) 37 (1) (अ) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Mumbai Crime | 3 minors killed a youth due to a dispute over bursting firecrackers, a shocking incident in Govandi area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | एसटी प्रवासात कुरिअर बॉयचे 24 लाख लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

Devendra Fadnavis | ‘…तेव्हाच मला राग येतो’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं

Pune CP Amitabh Gupta On Traffic Police | पोलिस आयुक्तांच्या रडारवर वाहतूक अमलदारही; विशेष पथकांचा ‘वॉच’

 

Related Posts