IMPIMP

Mumbai High Court | न्या. देवेंद्र उपाध्याय मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती

by nagesh
Mumbai High Court | justice devendra upadhyay appointed as a new chief justice of bombay high court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Mumbai High Court | अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय (Justice Devendra Kumar Upadhye) यांची मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai Hig h Court) मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने (Central Government) या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) न्यायवृंदाने काही दिवसांपूर्वी ही शिफारस (Recommend) केली होती. त्यावर केंद्र सरकारतर्फे राष्ट्रपतींनी (President) शिक्कामोर्तब करत तशी अधिसूचना जारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) मुख्य न्यायमूर्ती रमेश धनुका (Justice Ramesh Dhanuka) हे 30 मे रोजी निवृत्त झाले. त्यानंतर न्यायमूर्ती नितीन जामदार (Justice Nitin Jamdar) यांची उच्च न्यायालयाचे प्रभारी असल्याने मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. न्यायमूर्ती जामदार हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

दरम्यान 6 जुलै रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud),
न्यायमूर्ती संजय कौल (Justice Sanjay Kaul) आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना (Justice Sanjiv Khanna)
यांच्या न्यायवृंदाने न्या. देवेंद्र उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.

Web Title : Mumbai High Court | justice devendra upadhyay appointed as a new chief justice of bombay high court


हे देखील वाचा

Related Posts