IMPIMP

Mumbai Metro | ‘मेट्रो २ अ’ मार्गिकेत ३६ महिन्यांचा विलंब; ‘तरीही कंत्राटदाराला ३६ लाखांचाच दंड मात्र…’

by nagesh
Mumbai Metro | metro 2a route 36 months late service contractor fined 36 lakhs mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Mumbai Metro  | दहिसर ते अंधेरी पश्चिम या मेट्रो २ अ च्या मार्गिकेच्या (Mumbai Metro) पूर्णत्वास तब्बल ३६ महिने उशीर झाला तरीही कंत्राटदाराला केवळ ३६ लाखांचा दंड आकारण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या. (Mumbai Metro)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मेट्रो २ चे काम हे दोन टप्प्यांमध्ये सुरू असून यातील पहिला (मेट्रो २ अ) टप्पा हा दहिसर ते अंधेरी पश्चिम तर दुसरा टप्पा (मेट्रो २ ब) हा अंधेरी पश्चिम ते मंडाले हा आहे. त्यातील मेट्रो २ अ प्रकल्पाचे काम देखील दोन टप्प्यात करण्यात आले आहे. त्यानुसार पहिला टप्पा हा दहिसर ते डहानूकरवाडी असून हा टप्पा एप्रिल २०२२ पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. त्यानंतर आता वळनई ते अंधेरी पश्चिम या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. उद्धाटनानंतर मेट्रो २ अ हा टप्पा दि.१९ दुपारी ४ वाजल्यापासून प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील रहिवाश्यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे. मात्र नियोजीत कालावधीपेक्षा या टप्प्याच्या पुर्णत्वास ३६ महिन्याचा अधिकचा कालावधी लागल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली.

 

सामाजिक कार्यकर्ते यांना माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, ही मार्गिका ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होती. मात्र संपूर्ण मार्ग सुरू होण्यासाठी, काम पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांचा विलंब झाला आहे. कंत्राटदारांना ३६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकाराखाली उपलब्ध करून दिली आहे. या विलंबासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडी) कंत्राटदारांना केवळ ३६ लाख रुपये दंड केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) बांधकामात सुरक्षा उल्लंघन आणि प्रकल्पस्थळी सुरक्षा सुधारबाबतीत सुरक्षा
दंड आकारण्यात आला आहे. पण त्याची माहिती देण्यात आलेली नाही.
विद्युत कामात करण्यात आलेल्या दिरंगाईबाबत ३६ लाखांचा दंड आकारला आहे.
यात माविन स्विचगर्स ॲण्ड कंट्रोल या कंत्राटदारांस ४.४४ लाख रुपये, स्टर्लिंग ॲण्ड विल्सन व सिमेचेल इलेक्ट्रिक
या कंत्राटदारांस १.५० लाख रुपये, जॅक्सन या कंत्राटदारांस १.५३ लाख रुपये, केटीके ग्रुप चीन या कंत्राटदारांस
२८.५४ लाख रुपये इतका दंड करण्यात आला आहे. काम पूर्ण होण्यास झालेली दिरंगाई लक्षात घेता आकारण्यात
आलेला दंड खूपच कमी आहे. त्यामुळे कंत्राटदारांचाच यात विचार केला गेला, असा आरोप गलगली यांनी केला आहे.

 

Web Title :- Mumbai Metro | metro 2a route 36 months late service contractor fined 36 lakhs mumbai

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | खुनाच्या तयारीत असलेल्या कोयता गँगला गुन्हे शाखेकडून अटक, कुऱ्हाड, कोयता, गुप्ती, तलवार जप्त

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना टोला; म्हणाल्या – ‘विरोधातील दिवस देखील…’

Chandrakant Patil | भिडे वाडा स्मारकाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार?; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भिडे वाडा जागा मालकाची भेट

 

Related Posts