IMPIMP

पदभार घेताच मुंबईचे नवे CP हेमंत नगराळेंनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘पोलिस एका नाजूक टप्प्यातून जाताहेत, योग्य पध्दतीने तपास होईल’

by pranjalishirish
mumbai police is going through difficult phase says new cp mumbai hemant nagrale

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – सध्या मुंबईत अँटिलीया प्रकरणावरून महाराष्ट्र राज्यात खळबळ उडाली आहे. एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे. या दरम्यान, उद्धव ठाकरे सरकारने मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली केली असून त्यांच्या जागी हेमंत नगराळे Hemant Nagarale यांची नियुक्ती केली. त्यानंतर हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

मुंबई पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले की, मुंबई पोलिस नाजूक टप्प्यात जात आहेत. अशा काही घटना घडल्याने प्रतिमा डागाळली आहे. आम्ही या अडचणीवर मात करण्याचा उपाय शोधू. माझी महाराष्ट्र शासनाने आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे आणि मी ही जबाबदारी स्वीकारली आहे.

हेमंत नगराळे Hemant Nagarale  म्हणाले की, मुंबई पोलिस कठीण टप्प्यातून जात आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. सर्व पोलिस अधिकारी एकत्रितपणे या समस्येपासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतील. राज्य सरकारने मला यासाठी नेमले आहे. येत्या काही दिवसांत मुंबई पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचे काम फार महत्त्वाचे ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून जे काही घडत आहे आणि त्यात पोलिस अधिकार्‍यांचा सहभाग योग्य नाही. एनआयए आणि एटीएस या आँटिलीया प्रकरणाचा तपास करत आहेत आणि जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

या काळात हेमंत नगराळे यांनी लोकांना या विषयावर अंदाज बांधू नका, असे आवाहन केले आहे. खटल्याशी संबंधित तथ्यांकडे लक्ष द्यावे. सध्या त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. ते पुढे म्हणाले की, माझ्याकडे कोणतीही तथ्य नाही किंवा आकडेवारी नाही, म्हणून याक्षणी मला या विषयावर भाष्य करण्याची इच्छा देखील नाही. मी यापूर्वी मुंबई पोलिसात काम केले आहे आणि त्यानंतर मी सर्व प्रश्नांची उत्तरे देईन.

मुंबई पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नवीन सीपी हेमंत नगराळे Hemant Nagarale म्हणाले, मुंबई पोलिस नाजूक टप्प्यात जाताहेत. आम्ही या अडचणीवर मात करण्याचा उपाय शोधणार आहे. माझी महाराष्ट्र शासनाने आयुक्त म्हणून नियुक्ती केलीय आणि मी ही जबाबदारी स्वीकारली आहे. नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा डागाळलीय.

सध्या सचिन वझे यांच्या नावामुळे पोलिसांची प्रतिमेला धक्का बसला आहे. त्यामुळे पोलिसांवरच आता संशय व्यक्त केला जात आहे की काय? अशी स्थिती आहे. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचं आव्हान आता नवे सीपी हेमंत नागराळे यांच्या समोर आहे, असे समजत आहे.

Also Read : 

WB Elections : ममतादीदींकडून आश्वासनांची बरसात

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

Related Posts