IMPIMP

Mumbai-Pune Expressway | पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर तात्पुरती टोल माफी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

by nagesh
Mumbai-Pune Expressway mumbai pune express way toll free for repairing traffic issue cm eknath shinde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन (Mumbai-Pune Expressway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) दुरुस्तीचे काम सुरु असल्याने टोल न आकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. याशिवाय द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी (Traffic Jam) फोडण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) दुरुस्तीचे काम सुरु आहे. ओव्हरहेड गॅन्ट्रीच्या (Overhead Gantry) कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. तसेच गणेशोत्सव (Ganeshotsav आणि विकेंडमुळे पर्यटकांची गर्दी होत आहे. यामुळे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती टोलमाफी (Toll Free) देण्याचे आदेश दिले आहेत. आज दिवसभरासाठी ही टोलमाफी असणार आहे.

 

दरम्यान, काल महामार्गाच्या दुरुस्तीचे कामामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर आज वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्गावर एक दिवसासाठी टोलमाफी देण्यात आली आहे.

 

गणेशभक्तांसाठी 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर टोल माफ

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना, वाहनांना राज्य शासनाने पथकर माफी जाहीर केली असून त्याचे जिल्ह्यात काटेकोर पालन करत गणेशभक्तांना कोणत्याही असुविधेला सामोरे जावे लागू नये याची दक्षता घ्यावी,
असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिले.
27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत ही पथकर माफी असणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पुण्यातून जाणाऱ्या मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग Mumbai Bangalore National Highway (एनएच 48) तसेच इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या गणेश भाविकांच्या वाहनांना ही पथकर माफी देण्याबाबत शासन परिपत्रकानुसार निर्देश देण्यात आले आहेत.
यापूर्वी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी पथकर माफी देण्यात आली होती.
हा अनुभव लक्षात घेऊन पथकर माफीची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.

डॉ. देशमुख म्हणाले, या परिपत्रकानुसार टोलमाफी देण्याचे पथकर नाके चालकांना निर्देश देण्यात आले असून
पथकर नाक्यांच्या ठिकाणी शासनाने निश्चित केलेल्या नमुन्यातील पथकर माफी पास उपलब्ध करुन देण्यात येतील.
पोलीस विभाग आणि परिवहन विभागाच्या समन्वयातून हे काम केले जाईल.

 

Web Title : –  Mumbai-Pune Expressway | mumbai pune express way toll free for repairing traffic issue cm eknath shinde

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

 

 

Related Posts