IMPIMP

Mumbai Pune Expressway | 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे प्रवास महागणार! टोलदरात 18 टक्के वाढ, जाणून घ्या नवे दर

by nagesh
Mumbai Pune Expressway | mumbai pune expressway toll rates hike by 18 percent from 01 april 2023

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Mumbai Pune Expressway | इंधनदर, गॅसदर, महागाई वाढत होत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत असून आता त्यांचा प्रवासही महागला आहे. मुंबई-पुणे मार्गावर  हजारो प्रवासी रोज प्रवास करत असतात. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच मार्गावर असणाऱ्या टोल दरांमध्ये मोठी वाढ (Toll Rates Hike) करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आहे. त्यामुळे एक्सप्रेस वेचा प्रवास महागणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचा (Mumbai Pune Expressway) प्रवास 1 एप्रिल पासून महागणार आहे. एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी 18 टक्के अधिकची रक्कम भरावी लागणार आहे. 2004 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 वाढ करण्याची अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार 1 एप्रिल 2023 पासून टोलच्या दरात 18 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. हे टोलचे दर 2030 पर्यंत कायम असणार आहेत, अशी माहिती MSRDC कडून देण्यात आली आहे.

 

 

टोलनचे नवे दर

वाहन प्रकार आत्ताचे दर नवीन दर
चारचाकी 270 320
टेम्पो 420 495
ट्रक 580 685
बस 797 940
थ्री एक्सेल 1380 1630
एम एक्सेल 1835 2165

 

 

Web Title :- Mumbai Pune Expressway | mumbai pune expressway toll rates hike by 18 percent from 01 april 2023

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ‘उमेद’ कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या मागणीवर शासन सकारात्मक निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune Crime News | तडीपार गुंडाचा येरवड्यात राडा

Radhakrishna Vikhe-Patil | शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राधाकृष्ण विखे-पाटील

Shambhuraj Desai | कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत एक महिन्यात मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक लावणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

 

Related Posts