IMPIMP

Nana Patole | अजित पवारांच्या प्रतिक्रियेवर नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले- ‘अजित पवार यांची सही नसली तरी…’

by nagesh
Maharashtra Politics News | ncp ajit pawar answer congress nana patole allegations of alliance with bjp

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान (Winter Session) महाविकास आघाडी कडून गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता, याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. यामुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) मतभेद आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्टिकरण दिले आहे. अविश्वास ठरावासाठी 29 आमदारांच्या सह्या लागतात आम्ही 47 आमदारांच्या सह्या घेऊन प्रस्ताव दिल्याचे नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले अजित पवार?

अविश्वास प्रस्तावासंदर्भात अजित पवार यांना विचारणा केली असता आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं अजित पवार यांनी सांगितले. मला अध्यक्षांविरोधातील या अविश्वास ठराबाद्दलची काही कल्पना नाही. सध्या तरी अध्यक्ष एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत अशा प्रकारचा ठराव (No Confidence Motion) मांडता येत नाही. जर मी सहमती दर्शवली तर त्यावर माझी स्वाक्षरी आवश्यक असेल. मी या प्रकरणामध्ये नक्कीच लक्ष घालेन, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

अजित पवारांची सही नसली तरी…

विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास आणायचा असेल तर 29 आमदारांच्या सह्या लागतात,
मात्र आम्ही 47 आमदारांच्या सह्या प्रस्तावावर केल्या आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण (Ashok Chavan)
असतील बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) असतील अजित पवार असतील यांच्या सह्या नसल्या
तरीही महाविकास आघाडीकडून आम्ही अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. नियमाप्रमाणे त्यावर आता कारवाई होणे अपेक्षित असल्याचे नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.

 

Web Title :- Nana Patole | nana patoles reaction on ajit pawars statement

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | शेतजमिनीवरुन नंणदेकडून भावजयीच्या खूनाचा प्रयत्न, लोणी काळभोर परिसरातील घटना

Maharashtra Politics | अजित पवारांना अध्याक्षांविरोधातील अविश्वास ठारावाची माहिती नाही!, शिंदे गटाचा टोला म्हणाले- ‘विरोधकांमध्ये एकमेकांबद्दल विश्वासार्हता…’

Pune Traffic Police | उद्या (दि. 31 डिसेंबर) पुणे कॅम्प (लष्कर) परिसरातील वाहतूकीत बदल; फर्ग्युसन रोड आणि एमजी रस्ता 10 तासांसाठी नो-व्हेईकल झोन

 

Related Posts