IMPIMP

Maharashtra Politics | अजित पवारांना अध्याक्षांविरोधातील अविश्वास ठारावाची माहिती नाही!, शिंदे गटाचा टोला म्हणाले- ‘विरोधकांमध्ये एकमेकांबद्दल विश्वासार्हता…’

by nagesh
Maharashtra Politics | ncp ajit pawar not aware of no confidence motion shinde group mocks

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – Maharashtra Politics | नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात (Winter Session) राजकारण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव (Maharashtra Politics) आणला आहे. यासंदर्भात मविआ कडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत (Assembly Secretary Rajendra Bhagwat) यांना पत्र देण्यात आले आहे. काँग्रेसचे सुनील केदार (Congress Sunil Kedar), शिवसेनेचे सुनील प्रभू (Shiv Sena Sunil Prabhu), सुरेश वरपुडकर (Suresh Varpudkar), अनिल पाटील (Anil Patil) यांनी हे पत्र सचिवांना दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विशेष म्हणजे या ठरावाबद्दल आपल्याला काहीच माहितीच नसल्याची प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्यामुळे विरोधी पक्षांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अजित पवारांच्या (Maharashtra Politics) प्रतिक्रियेनंतर शिंदे गटाने त्यांना खोचक टोला लगावला आहे.

 

 

असा अविश्वास ठराव मांडता येत नाही- पवार

यासंदर्भात अजित पवार यांना विचारणा केली असता आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं अजित पवार यांनी सांगितले. मला अध्यक्षांविरोधातील या अविश्वास ठराबाद्दलची काही कल्पना नाही. सध्या तरी अध्यक्ष एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत अशा प्रकारचा ठराव (No Confidence Motion) मांडता येत नाही. जर मी सहमती दर्शवली तर त्यावर माझी स्वाक्षरी आवश्यक असेल. मी या प्रकरणामध्ये नक्कीच लक्ष घालेन, असं अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीत सारंकाही अलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

विरोधकांमध्ये एकमेकांबद्दल विश्वासर्हता दिसत नाही

अजित पवार यांनी अविश्वास ठरावासंदर्भात माहित नसल्याचे सांगितल्यानंतर शिंदे गटाचे
(Shinde Group) आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी अजित पवारांना खोचक
टोला लगावला आहे. अजित पवारांचे वक्तव्य मी पाहिलं. खरंतर सभागृहात कामकाज पाहताना कधी आपल्या
विरोधी पक्षनेत्याला विश्वासात घेऊन सर्व विरोधी सदस्यांनी गोष्टी करायला पाहिजेत.
परंतु विरोधकांमध्ये एकमेकांबद्दल विश्वासार्हता दिसत नाही.
जर विरोधी पक्षनेते म्हणत आहेत की मला त्याबद्दल माहिती नाही, तर हे त्याचंच प्रतीक असल्याचे
गायकवाड म्हणाले. तेच अजित पवार यांचा स्वभाव स्पष्ट असतो. ते सरळ बोलतात. बेधडक बोलतात.
ते कुणाकडूनच नसतात. जे खरं आहे त्या बाजूने ते असतात, असे सूचक विधान गायकवाड यांनी केलं.

 

Web Title :- Maharashtra Politics | ncp ajit pawar not aware of no confidence motion shinde group mocks

 

हे देखील वाचा :

Pune Traffic Police | उद्या (दि. 31 डिसेंबर) पुणे कॅम्प (लष्कर) परिसरातील वाहतूकीत बदल; फर्ग्युसन रोड आणि एमजी रस्ता 10 तासांसाठी नो-व्हेईकल झोन

Gautami Patil | सोलापुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी; प्रेक्षकांनी देखील धरला ठेका

Pune Traffic Police | 1 जानेवारीला नववर्षानिमित्त दगडूशेठ गणपती येथे दर्शनासाठी येणार्‍या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीत बदल

 

Related Posts