IMPIMP

Nana Patole | …म्हणून राज्यपाल भाषण अर्धवट टाकून गेले’; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

by nagesh
Nana Patole | so the governor s speech was partially discarded Nana Patole s sensational claim

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनNana Patole | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session) आजपासून सुरूवात झाली. मात्र आजचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला, त्यासोबतच आणखी एक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचं भाषण. (Nana Patole)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अधिवेशनाला प्रथेप्रमाणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने सुरूवात होते. त्याप्रमाणे राज्यपालांनी आपलं भाषण चालू केलं आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी घोषणाबाजी करायला सुरूवात केली. या गोंधळात राज्यपालांनी आपलं भाषण आवरलं आणि काढता पाय घेतला अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. मात्र अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी खळबळजनक दावा केला आहे.

 

राज्यपाल कोश्यारी गोंधळामुळे नाही तर, भाषणातील काही ओळी वाचायला लागाव्या नकोत यासाठी ते भाषण (Speech) अर्धवट टाकून गेले असल्याचं नाना पटोले म्हणाले. माध्यमांशी बोलताना नाना पटोले (Nana Patole) यांनी त्या ओळी वाचून दाखवल्या.

 

या ओळींमध्ये बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याच्या विटंबनेचा उल्लेख होता.
राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपालांनी याचा आपल्या अभिभाषणात निषेध करावा अशी अपेक्षा महाविकास आघाडी सरकारची होती.
मात्र पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेचा निषेध (Prohibition) करण्यात कोश्यारी यांना अडचण वाटल्याचं नाना पटोले म्हणाले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, राज्यपालांनी केलेल्या निंदनीय कृत्याचं भाजपने (BJP) स्पष्टीकरण द्यायला हवं, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
यावर भाजप काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Nana Patole | so the governor s speech was partially discarded Nana Patole s sensational claim

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा कासारसाई धरणात बुडून मृत्यू

7th Pay Commission DA Arear | 18 महिन्याच्या DA एरियर बाबत आली मोठी माहिती, सॅलरीत येतील 2 लाख रुपये, झाले कन्फर्म

Pune Crime | विमानतळ पोलिसांकडून ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 4 मुलींची सुटका

Pune Metro | रविवारपासून नियमित धावणार ‘पुणे मेट्रो’, ‘या’ तिकीट दरात पुणेकरांना अनुभवता येणार मेट्रोचा सुखद प्रवास

 

Related Posts