IMPIMP

Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह विधानासंदर्भात नारायण राणे यांची आज सुनावणी

by nagesh
Narayan Rane | narayan rane to appear in alibag court case about objectionable words against ex cm uddhav thackeray

अलिबाग : सरकारसत्ता ऑनलाईन   महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरें विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात २४ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राणे यांना संगमेश्वर येथून अटक केली होती. तेव्हा नारायण राणे (Narayan Rane) रायगड येथे जनआशीर्वाद यात्रा करत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यानंतर महाड न्यायालयाने त्यांना अटी शर्थींवर जामीन मंजूर केला होता. राणेंचा (Naryaan Rane) हा खटला महाड न्यायालयातून अलिबाग जिल्हा न्यायालयात वर्ग झाला आहे. आज (१ डिसेंबर) या खटल्याची सुनावणी होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह वकिलांची फौज आहे.

 

२४ ऑगस्ट रोजी एका ठिकणी भाषणात बोलताना उद्धव ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते.
“आपल्या मुख्यमंत्र्याला जर भारताच्या स्वातंत्र्याचं वर्ष माहीत नसेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचे वर्ष विचारण्यासाठी मागे पाहिले.
मी जर तिथे असतो, तर तिथेच त्यांच्या कानाखाली लावली असती”, असे नारायण राणे म्हणाले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Narayan Rane | narayan rane to appear in alibag court case about objectionable words against ex cm uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तू मला…’, तळेगावमध्ये तरुणीचा भररस्त्यात विनयभंग

Jack Flint | लग्नानंतर काही तासांतच ‘या’ प्रसिद्ध गायकाने घेतला जगाचा निरोप

Raj Thackeray | राष्ट्रवादीने राजकारणासाठी शिवाजी महाराजांचे नाव वापरले, राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी – राज ठाकरे

 

Related Posts