IMPIMP

Narendra Modi Sarkar | मोदी सरकारने ‘मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप’ केली बंद; काँग्रेस नेते म्हणाले “हे सरकार मुस्लिम…”

by nagesh
Narendra Modi Sarkar | maulana azad fellowship stop central government minister smriti irani tells in lok sabha

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मोदी सरकारने (Narendra Modi Government) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी चालवली जाणारी ‘मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप’ (Maulana Azad National fellowship) बंद केली आहे. ही शिष्यवृत्ती उच्च शिक्षण (संशोधन) घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना देण्यात येत होती. काँग्रेस खासदार टीएन प्रतापन यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अल्पसंख्याक कल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी ही माहिती दिली. यापूर्वी केंद्र सरकारने अल्पसंख्याकांना मॅट्रिकपूर्व स्तरावर दिली जाणारी शिष्यवृत्तीही बंद केली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबद्दल अधिक माहिती देत स्मृती इराणी म्हणाल्या, ‘या योजनेसाठी यूजीसीच्या आकडेवारीनुसार 2014-15 आणि 2021-22 दरम्यान 738.85 कोटी रुपये जारी करण्यात आले. या योजनेचा लाभ एकूण 6,722 विद्यार्थ्यांना मिळाला होता. मात्र, स्मृती इराणींच्या उत्तरावर प्रतापन समाधानी झाले नाही. त्यांनी केंद्र सरकारला (Narendra Modi sarkar) मुस्लिमविरोधी म्हटले आहे. तसेच ही योजना बंद झाल्यामुळे अनेक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्यावर परिणाम होणार आहे, असे ते म्हणाले.

 

स्मृती इराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या उच्च शिक्षणासाठी इतर
फेलोशिप योजनांशी MANF योजना ओव्हरलॅप होत आहे. अल्पसंख्याक विद्यार्थी अशा इतर योजनांचा लाभ
घेत आहेत, त्यामुळे सरकारने 2022-23 पासून MANF योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.’

 

Web Title :- Narendra Modi Sarkar | maulana azad fellowship stop central government minister smriti irani tells in lok sabha

 

हे देखील वाचा :

Pakistan Webseries | सोशल मीडियावर होतोय ‘या’ पाकिस्तानी वेबसीरिजला प्रचंड विरोध; पहिला भाग युट्यूबवर प्रदर्शित

Traffic Police | आता अल्पवयीनांना गाडी चालवताना होणार ‘इतक्या’ रुपयांचा दंड

NCP Leader Ajit Pawar | चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर अजित पवारांचे नागरिकांना आवाहन; म्हणाले, “ही भाषा बदलण्याची ताकद तुमच्यात…..”

Uddhav Thackeray | मी मुख्यमंत्री असतो, तर आज… – उद्धव ठाकरे

 

Related Posts