IMPIMP

Uddhav Thackeray | मी मुख्यमंत्री असतो, तर आज… – उद्धव ठाकरे

by nagesh
Uddhav Thackeray | shivsena uddhav thackeray targets cm eknath shinde abdul sattar controversy

घनसावंगी : सरकारसत्ता ऑनलाईन   घनसावंगी येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित होते. यावेळी ठाकरेंनी विविध मुद्यांवर भाष्य केले, तसेच त्यांनी शिंदे गट व सरकार टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरूनही त्यांनी (Uddhav Thackeray) फटकारले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आज संत ज्ञानेश्वर हयात नाहीत, ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या काळात वेद बोलणारा रेडा होता. आताचे रेडे वेगळे आहेत. हे वेद वगैरे काही बोलणार नाहीत. फक्त खोका, खोका बोलतील. बाकी काही बोलणार नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आत्ता विचारांचे दारिद्र्य असलेले राज्यकर्ते विद्यापीठांसाठी भीक मागायला सांगत आहेत, ते तुम्हाला पसंत असतील, तर हे सर्व फुकट गेले असे आम्ही समजू आणि नसतील, तर ते घालवायचे कसे, त्याचा निश्चय करा असेही ठाकरे म्हणाले.

 

उद्धव ठाकरेंनी यावेळी अब्दुल सत्तार यांचा समाचार घेतला. अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केली होती. त्यावर ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी माता-भगिनींचा मान राखायला आम्हाला शिकवले. आता त्यांच्या महाराष्ट्रात एका महिलेचा अपमान करणारा मंत्री अजूनही मंत्रिमंडळात आहे. हे लोक काय आम्हाला शिवाजी महाराज शिकवणार? जर मी त्या ठिकाणी असतो, तर अब्दुल सत्तारला मंत्रिमंडळातून काढून टाकले असते. त्यामुळे नुसती भाषणे देऊन उपयोग नाही. अब्दुल सत्तारला मंत्रिमंडळातून काढून टाका.

 

समृद्धी महामार्ग तर झालाच पाहिजे. पण, एका मोठ्या मार्गाचे उद्धाटन होत असताना महाराष्ट्र आणि कर्नाटकचा रस्ता
कर्नाटक जर महाराष्ट्रासाठी बंद करत असेल, तर त्यावर तुम्ही काय बोलणार आहात? तुमची त्यावर भूमिका काय? असे प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केले.
ते आधी पंतप्रधानांनी सांगावे आणि त्यानंतर शिवसेना प्रमुखांचे नाव असलेल्या रस्त्याचे उद्घाटन करावे.
बाळासाहेब ठाकरे सीमाप्रश्नावर तीन महिने तुरुंगात राहिले होते.
त्यांनी बेळगाव, कारवार आणि निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ही भूमिका घेतली होती.
पण, आज बाळासाहेबांची शिवसेना म्हणाऱ्या पक्षानेसुद्धा त्यांची भूमिका काय आहे, हे स्पष्ट केले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | shivsena uddhav thackeray targets cm eknath shinde abdul sattar controversy

 

हे देखील वाचा :

Abdul Sattar | उद्धव ठाकरेंसोबत असतो, तर माझ्या नावापुढे “ही” पाटी लागली असती – अब्दुल सत्तार

Pune Crime | पुण्यात पीएमपीएमएल चालकाला बेदम मारहाण; तिघांविरुद्ध FIR

Uddhav Thackeray | उद्या मोदी येऊन आम्हाला टोमणे मारतील – उद्धव ठाकरे

 

Related Posts