IMPIMP

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे, केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

by nagesh
Google Pay-Paytm-ATM | withdraw cash from atm using google pay and paytm by just scanning qr code

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Google Pay-Paytm-ATM | एटीएममधून पैसे काढण्याचा एकमेव मार्ग डेबिट कार्ड (Debit Card) किंवा एटीएम कार्ड (ATM Card) नाही. आजकाल एटीएममधून इतर अनेक मार्गांनी पैसे काढता येतात. यामध्ये गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम (Paytm) वॉलेटचाही समावेश आहे. तुमच्या मोबाईलमध्ये असे वॉलेट असल्यास तुम्ही एटीएममधून सहज पैसे काढू शकता. (Withdraw Cash From ATM) एटीएम कार्ड सोबत असणे आवश्यक नाही. जवळपास मोबाईल असल्यास एटीएममधून पैसे काढता येतात. (Google Pay-Paytm-ATM)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पेटीएम असो, गुगल पे किंवा फोनपे, अशा UPI आधारित मोबाइल वॉलेटचा वापर एटीएममधून पैसे काढण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी रिझर्व्ह बँकेने विशेष सूचना जारी केली आहे. ग्राहकांना पैसे काढता यावेत आणि एटीएम व्यतिरिक्त पर्यायी मार्ग वापरून पैसे काढता यावेत यासाठी ही सुविधा UPI आधारित मोबाइल अ‍ॅपवरून सुरू करण्यात आली आहे.

 

QR कोड स्कॅन करून काढा पैसे
यासाठी तुम्हाला फक्त QR Coad स्कॅन करावा लागेल. याला इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश ट्रान्झॅक्शन असे नाव देण्यात आले आहे. कार्ड न वापरता एटीएममधून पैसे काढता येतात. (Google Pay-Paytm-ATM)

 

तुम्ही तुमचे एटीएम कार्ड घरी विसरल्यास, पेटीएम किंवा गुगल पे सारख्या युपीआय अ‍ॅपचा वापर करून एटीएममधून पैसे काढू शकता. यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा एनपीसीआयने विशेष नियम केले आहेत. तुम्ही फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करून एटीएममधून पैसे काढू शकता.

तुमच्या मोबाईलमध्ये Paytm, Google Pay किंवा PhonePe सारखे कोणतेही UPI अ‍ॅप उघडा. तुम्ही Amazon देखील वापरू शकता.

पैसे काढायच्या ATM च्या स्क्रीनवर QR कोड दिसेल, जो मोबाईल अ‍ॅपवरून स्कॅन करा.

मोबाइलवरील युपीआय अ‍ॅपमध्ये, एटीएममधून किती रक्कम काढायची आहे ती टाका.

लक्षात ठेवा अशाप्रकारे एटीएममधून कमाल 5,000 रुपये काढू शकता.

यानंतर प्रोसीड बटणावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यावर अ‍ॅपवर 4 किंवा 6 अंकी पिन टाकावा लागेल.

पिन टाकल्यानंतर एटीएममधून नोटा बाहेर येतील, त्या घ्या. आता तुमच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा एसएमएस येईल.

ज्या खात्यातून पैसे कापले जातील, त्या बँकेकडून तुम्हाला एटीएममधून पैसे काढल्याचा मेसेज येईल. हा संदेश सुरक्षिततेसाठी पाठवला जातो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

युपीआय आधारित व्यवहारांची वाढती लोकप्रियता पाहता हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. खरं तर, या सुविधेचा विचार फक्त आपत्कालीन परिस्थितीत करा कारण जास्तीत जास्त पैसे काढण्याची मर्यादा फक्त 5,000 रुपये ठेवण्यात आली आहे. आजकाल बहुतेक लोकांच्या मोबाईलमध्ये कोणते ना कोणते UPI अ‍ॅप असल्याने एटीएम सुविधा अधिक सोयीस्कर झाली आहे.

 

Web Title :- Google Pay-Paytm-ATM | withdraw cash from atm using google pay and paytm by just scanning qr code

 

हे देखील वाचा :

Pune Corona | चिंताजनक ! पुणे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजारांच्यावर, गेल्या 24 तासात 2200 हून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Dangerous Combination With Eggs | अंड्यांसोबत ‘हे’ पदार्थ खाऊ नये अन्यथा आरोग्याचं होईल मोठं नुकसान, जाणून घ्या

Pune Crime | अल्पवयीन वाहन चोर 24 तासात ताब्यात ! 4 लाखांचा मुद्देमाल जप्त; लोणी काळभोर पोलिसांची कारवाई

 

Related Posts