IMPIMP

Nawab Malik Hospitalized | नवाब मलिक तुरुंगात कोसळले, स्ट्रेचरवरून दवाखान्यात दाखल, वकिलांची कोर्टात माहिती !

by nagesh
Nawab Malik Hospitalized | ncp leader nawab malik collapsed in jail hospitalized lawyer informed in court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Nawab Malik Hospitalized | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे तुरूंगात कोसळले असून त्यांना जे. जे. रूग्णालयात (Nawab Malik Hospitalized) दाखल करण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती मलिकांचे वकील कुशल मोरे यांनी विशेष पीएमएलए कोर्टात (Special PMLA Court) दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सोमवारी दुपारी कारागृहात कथितरित्या कोसळल्यानंतर नवाब मलिक यांना जे. जे. रुग्णालयात (J. J. Hospital) हलवण्यात आले असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितले. मंत्री नवाब मलिकांची प्रकृती ठिक नसल्याच्या कारणावरून त्यांच्या वकिलांकडून जामीन अर्ज करण्यात आला मात्र ईडीने (ED) या जामीन अर्जाला विरोध केला आहे.

 

 

गेल्या अनेक दिवसांपासून मलिक हे जामीनासाठी कोर्टात धाव घेत आहेत मात्र सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांची याचिका (Petition) स्वीकारण्यास नकार दिला, तर पीएमएलए न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 6 मे पर्यंत वाढवली, त्यामुळे मलिक आणखी अडचणीत आले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, न्यायालयाने नवाब मलिक यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल हा मागवला आहे. आता मलिक यांना खाजगी रूग्णालयात हलवायचं की नाही यावर 5 मे ला सुनावणी होणार आहे. मलिकांच्या वकिलांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांची निलोफर मलिक (Nilofer Malik) आणि जावई समीर खान या दोघांना (Sameer Khan) मलिकांना भेटण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे.

 

Web Title :- Nawab Malik Hospitalized | ncp leader nawab malik collapsed in jail hospitalized lawyer informed in court

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वानवडीत बांधकाम सुरु असलेल्या धार्मिक स्थळाचा स्लॅब कोसळला, 7 जण जखमी तर 3 गंभीर

Kishori Pednekar | ‘देवेंद्र फडणवीसही बाबरी पतनानंतर तुरुंगात होते, हे नाकारत नाही पण…’; किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य

Pune News | बंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी शंकर आथरे

 

Related Posts