IMPIMP

Kishori Pednekar | ‘देवेंद्र फडणवीसही बाबरी पतनानंतर तुरुंगात होते, हे नाकारत नाही पण…’; किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य

by nagesh
Kishori Pednekar | kishori pednekar will be interrogated today in the sra scam case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kishori Pednekar | शिवसेना (Shivsena) दावा करते की आम्ही बाबरी पाडली मात्र वास्तविक तिथे एकही शिवसैनिक नव्हता, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते. मुंबईतील भाजपच्या बुस्टर सभेत (BJP Booster Sabha) फडणवीस बोलत होते. यावरून शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी (Kishori Pednekar) प्रत्युत्तर देत भाजपवर निशाणा साधला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बाबरीचा घुमट पडल्यानंतर सगळ्यांची पळता भुई थोडी झाली होती. कोणीही बाबरी पतनाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते.
त्यावेळी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती, असं किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या.
त्यासोबतच शिवसैनिक हे बाबरीच्या पतनावेळी तिथे होते की नाही हे तपासण्यासाठी उत्तर प्रदेशातील सर्व रेकॉर्ड चेक करावेत, असंही पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

 

देवेंद्र फडणवीसही बाबरी पतनानंतर तुरुंगात होते,
हे मी नाकारत नाही पण त्यांच्यासोबत शिवसैनिकही तुरुंगात होते ही बाब त्यांनी स्वीकारली पाहिजे.
फडणवीस वरिष्ठ नेते आहेत, त्यांचे राजकीय कार्य चांगले आहे. पण ते खोटं बोलून स्वत:ची प्रतिमा मलिन करत असल्याचं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, मी स्वत: 27 महिलांसह अयोध्येला (Ayodhya) जाण्यासाठी कल्याणमध्ये (Kalyan) गाडीत बसले होते मात्र महिलांनी यायचं नाही असं सांगत आम्हाला उतरावलं होतं त्यामुळे बाबरी पतनाला गेले होते असं खोटं सांगणार नाही, असं पेडणेकरांनी सांगितलं.

 

Web Title :- Kishori Pednekar | shiv sena kishori pednekar replied bjp devendra fadnavis over babri masjid case

 

हे देखील वाचा :

Pune News | बंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी शंकर आथरे

Dilip Walse Patil | राज ठाकरेंच्या सभेवर गृहमंत्र्यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले…

Raj Thackeray on Mahaarati | मनसेची राज्यभरातील महाआरती रद्द, राज ठाकरेंचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाले…

Sanjay Raut on Raj Thackeray | ‘महाराष्ट्र हे लेच्यापेच्यांचं राज्य नाही’ ! राज ठाकरेंच्या 4 तारखेच्या डेडलाईनवर संजय राऊतांचा पलटवार

 

Related Posts