IMPIMP

NCP Political Crisis | अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांची जितेंद्र आव्हाडांवर मोठी जबाबदारी, प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदावर नियुक्ती

by nagesh
NCP Political Crisis | jitendra awhad opposition leader of maharashtra vidhan sabha ajit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – NCP Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला एक वर्ष झाल्यानंतर राज्यात आणखी एक मोठे राजकीय बंड झाले. अजित पवार (Ajit Pawar DyCM Oath) यांनी काही आमदारांना हाताशी घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड (NCP Political Crisis) केले. अजित पवार आणि आठ आमदारांनी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर आता राष्ट्रवादीमधील नव्या नेत्यांकडे काही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीने पक्षाचे मुख्य प्रतोद (Pratod) आणि विरोधी पक्ष नेतेपदी (Opposition Leader) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनिल पाटील (Anil Patil) यांच्याकडे प्रतोद पद होते. अनिल पाटील हे अजित पवार यांच्यासोबत बंडात (NCP Political Crisis) सहभागी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. तसेच अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवले आहे.

 

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

जितेंद्र आव्हाड यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद दिल्यामुळे राज्याला मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेता एकाच जिल्ह्यातून मिळाला आहे. एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे ठाण्याचे आहेत. एकाच जिल्ह्यातील मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेता होण्याची ही पहिलीच घटना आहे.

माझा व्हिप सर्वांना लागू होईल – जितेंद्र आव्हाड

आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याकडे आहे.
त्यांनी माझी प्रतोद आणि विरोधीपक्षनेतेपदी निवड केली आहे. मी जे व्हीप काढेल ते त्यांना लागू होईल,
असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. 25-25 वर्ष मंत्रिपद भोगली. ज्या नेत्याने पराकाष्ठा केली ते पद तुम्हाला दिली.
या माणसाला या वयात ज्याचा अखेरचा काळ आहे, त्या बापाला अशा परिस्थितीमध्ये आणणं हे माणुसकीला पटणार नाही,
अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच मी मेलो तरी शरद पवार यांना सोडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Web Title : NCP Political Crisis | jitendra awhad opposition leader of maharashtra vidhan sabha ajit pawar

Related Posts