IMPIMP

NCP Political Crisis | बंडानंतर अजित पवारांना पहिला धक्का, खा. अमोल कोल्हेंनी सोडली साथ; म्हणाले – ‘सगळ विसरायचं.. पण बापाला नाही’ (व्हिडिओ)

by nagesh
NCP Political Crisis | mp amol kolhe returns to sharad pawar ncp leaves ajit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन –NCP Political Crisis | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात बंड केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर 8 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. (NCP Political Crisis) शपथविधी सोहळ्याला शिरुरचे खासदार अमोल कोल्हे (Shirur MP Amol Kolhe) हे देखील उपस्थित होते. मात्र, उपमुख्यमंत्री पदाची शपथ (DyCM Oath) घेऊन काही तास होत नाहीत तोच अजित पवारांना पहिला धक्का बसला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यासोबत असल्याचं जाहिर केलं आहे.

अजित पवार यांच्या शपथविधीला खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. एवढंच नाही तर कार्यक्रमानंतर अमोल कोल्हेंचा सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या पाया पडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटात (Ajit Pawar Group) सहभागी झाल्याचे सांगितले जात होते. अजित पवारांनी देखील सर्वांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगितले होते. परंतु आज अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार साहेबांसोबतच असल्याचं ट्विट करुन आपली भूमिका स्पष्ट केली. (NCP Political Crisis)

https://twitter.com/kolhe_amol/status/1675784887692042242?s=20

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘जब दिल और दिमाग मे जंग हो तो दिल की सुनो |
शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है… पर दिल कभी नहीं | #मी_साहेबांसोबत’, असं अमोल कोल्हे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना शपथविधीबाबत आपल्याला माहिती नव्हती असा दावा कोल्हे यांनी केला.
मी शरद पवारांसोबतच आहे. मी त्यांना भेटून सविस्तर प्रतिक्रिया देईन.
मी काल एका वेगळ्या कामासाठी भेटायला गेलो होतो. मला शपथविधीची कल्पना नव्हती, असं अमोल कोल्हे म्हणाले होते.

Web Title : NCP Political Crisis | mp amol kolhe returns to sharad pawar ncp leaves ajit pawar

Related Posts