IMPIMP

Alternatives of Tomato | टोमॅटो ऐवजी ‘या’ ५ गोष्टी आरोग्याला देतील जास्त फायदे, डॉक्टरांनी सुद्धा केले शिक्कामोर्तब

by nagesh
Alternatives of Tomato | tamarind-curd-red-ball-paper-among-5-super-delicious-alternative-of- tomatoes-gravy-that-you-can-make-without-tomato

नवी दिल्ली : Alternatives of Tomato | टोमॅटो हा प्रत्येक भाजीत वापरला जातो. टोमॅटोशिवाय रस्सा आणि भाजीचा रंग दोन्ही निस्तेज होतात. मात्र अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत (Alternatives of Tomato).

टोमॅटो शंभर रुपयांपेक्षा महाग असल्याने लोक खरेदी करणे टाळत आहेत. उत्तर भारतातील लोकांना ही सवय नसली तरी दक्षिण भारतात टोमॅटोऐवजी भाजीमध्ये इतरही अनेक गोष्टी टाकल्या जातात. ज्यामुळे टोमॅटोपेक्षा चांगली ग्रेव्ही बनते आणि त्याचा रंगही चांगला दिसतो. टोमॅटोला कोणते पर्याय आहेत हे जाणून घेऊया. (Alternatives of Tomato)

डॉक्टरांनी सांगितले टोमॅटोसाठी पर्याय

१. चिंच कमी करते किडनी स्टोन –

अपोलो हॉस्पिटल्स, बंगलोरच्या मुख्य क्लिनिकल न्यूटिड्ढशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी म्हणतात की चिंच हा टोमॅटोला उत्तम पर्याय आहे. ज्यांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांच्यासाठी ती खूप फायदेशीर आहे. त्या म्हणाल्या, राजस्थानसारख्या काही भागात लोकांना किडनी स्टोनची समस्या जास्त आहे. अशा वेळी टोमॅटोऐवजी चिंचेचा वापर केल्यास किडनी स्टोनपासून आराम मिळू शकतो. चिंचेमध्ये टार्टेरिक अ‍ॅसिड असते जे किडनी स्टोन विरघळण्यास मदत करते.

२. आंबट दह्यात बेसन –

आंबट दह्यात बेसन मिसळून भाजीमध्ये वापरल्यास टोमॅटोची कमतरता जाणवणार नाही. यामध्ये भरपूर प्रोटीन मिळेल आणि पदार्थ चविष्ट होईल.

३. लाल सिमला मिरची –

टोमॅटो खूप महाग झाले असतील तर लाल सिमला मिरची आणून हलकी भाजून ग्रेव्ही ऐवजी भाजीत मिसळा. लाल सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि त्यात अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे फ्री रॅडिकल्सपासून पेशींचे संरक्षण करते आणि इम्युनिटी वाढवते.

४. भोपळ्याची पेस्ट

गावांमध्ये टोमॅटोऐवजी अनेकदा भोपळा वापरला जातो.
कारण भोपळ्याचे अनन्य फायदे आहेत. भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई,
आयर्न, फोलेट, बीटा कॅरोटीन यासह अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आढळतात, जे वजन नियंत्रित ठेवतात आणि रक्तदाब संतुलित ठेवतात. भोपळ्यामुळे त्वचेवर चमकही येते.

५. व्हिनेगर –

टोमॅटोऐवजी भाज्यांमध्ये व्हिनेगर घालणे खूप फायदेशीर आहे.
व्हिनेगर गुड बॅक्टेरिया फर्मेंटेड करते ज्यामुळे चव आंबट होते. व्हिनेगरमध्ये फॉस्फरस,
मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, सोडियम, कॅल्शियम यांसारखे पोषक घटक आढळतात.
याशिवाय व्हिनेगरमध्ये अँटीफंगल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. व्हिनेगरचा वापर भाज्यांमध्ये खूप फायदेशीर ठरू शकतो.

Web Title : Alternatives of Tomato | tamarind-curd-red-ball-paper-among-5-super-delicious-alternative-of-
tomatoes-gravy-that-you-can-make-without-tomato

Related Posts