IMPIMP

Curry Leaves Benefits | शरीरासाठी चमत्कारी आहे हे हिरवे पान, जेवणातून काढून टाकतात अनेक लोक, कधीही करू नका ‘ही’ चूक, होतील 5 फायदे

by nagesh
Curry Leaves Benefits | 5-amazing-benefits-of-curry-leaves-control-blood-sugar-reduce-heart-disease

नवी दिल्ली : Curry Leaves Benefits | भारतीय जेवणात कढीपत्ता मोठ्या प्रमाणात वापरला जातो. चव वाढवण्यासोबतच तो आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. कढीपत्ता औषधी कारणांसाठी देखील वापरला जातो. (Curry Leaves Benefits)

कढीपत्त्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असते, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून शरीराला रोगांपासून वाचवते. तो शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकतो, ज्यामुळे निरोगी राहता येते. बरेच लोक जेवण करताना कढीपत्ता काढतात, परंतु असे करू नये. कढीपत्ता खाल्ल्याने डायबिटीजसह अनेक आजारांपासून आराम मिळतो. जाणून घ्या कढीपत्त्याचे ५ फायदे (Health Benefits of Curry Leaves).

ब्लड शुगर करा कंट्रोल

डायबिटीजच्या रुग्णांसाठी कढीपत्ता खूप फायदेशीर आहे. हेल्थलाइनच्या अहवालानुसार, प्राण्यांच्या अभ्यासात असे आढळून आले की कढीपत्ता अर्क हाय ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत करतो. तसे मज्जातंतूचे दुखणे आणि किडनी डॅमेजसह डायबिटीजच्या लक्षणांपासून संरक्षण करतो. कढीपत्ता इन्सुलिन क्रिया वाढवतो, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते. (Curry Leaves Benefits)

हार्ट हेल्थ करतो बुस्ट

हाय कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. आहारात कढीपत्त्याचा समावेश केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. संशोधनात असे दिसून आले आहे की कढीपत्ता खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. मात्र, यावर अधिक संशोधन आवश्यक आहे.

मेंदू ठेवतो निरोगी

काही संशोधनात असे आढळले आहे की कढीपत्ता मेंदूसह मज्जासंस्थेचे संरक्षण करतो. कढीपत्त्यात अशी तत्व असतात जी अल्झायमरसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह स्थितीपासून संरक्षण करतात. या संदर्भात उंदरांसह अनेक प्राण्यांवर संशोधन झाले आहे. मात्र, मानवावर संशोधनाची गरज आहे. टेस्ट-ट्यूब आणि प्राणी संशोधनातून असे दिसते की कढीपत्त्यात देखील शक्तिशाली अँटीकॅन्सर गुणधर्म असू शकतात.

केस होतात मजबूत

कढीपत्त्यात भरपूर पोषकतत्व असल्याने नवीन केसांची वाढ होते. कढीपत्ता खाल्ल्याने केस गळणे टाळता येते.
कढीपत्त्यातील बीटा-कॅरोटीन आणि प्रोटीन केसांच्या मुळांना मजबूत करते. यातील आयर्न,
व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी टाळूचे पोषण करण्यास आणि निरोगी केसांच्या वाढीस मदत करते.

वजन होते कंट्रोल

कढीपत्ता डिटॉक्सिफायिंग एजंट म्हणून कार्य करतो, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते.
कढीपत्ता शरीरात चरबी जमा होण्यास प्रतिबंध करतो आणि यामुळे वजन कमी होते.
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी दररोज १०-१५ कढीपत्त्याचे सेवन करावे. कढीपत्ता त्वचेचे,
केसांचे आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारतो.

Web Title : Curry Leaves Benefits | 5-amazing-benefits-of-curry-leaves-control-blood-sugar-reduce-heart-disease

Related Posts