IMPIMP

Neeraj Chopra | नीरज चोप्राचा आणखी एक पराक्रम! उसेन बोल्टचा ‘तो’ विक्रम मोडला

by nagesh
Neeraj Chopra | another golden feat by indias golden boy neeraj chopra broke usain bolts record

सरकारसत्ता ऑनलाईन   – नीरज चोप्राला (Neeraj Chopra) ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक मिळाल्यानंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नीरज चोप्राचे भारतासह बाहेरच्या देशात करोडो चाहते आहेत. 2022 हे वर्ष नीरज चोप्रासाठी (Neeraj Chopra) चांगले गेले आहे. नीरज चोप्राच्या या कामगिरीवर त्याच्याबद्दल अनेक लेख लिहिले गेले. यावर्षी त्याच्या खात्यात आणखी एक मोठा विक्रम जमा झाला आहे. 2022 मध्ये नीरज चोप्रांवर सर्वाधिक लेख लिहिण्याचा विक्रम झाला. यामध्ये त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रासाठी (Neeraj Chopra) 2022 हे वर्ष खूप खास ठरले आहे. उल्लेखनीय म्हणजे, नीरज चोप्राने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते आणि असे करणारा तो पहिला अ‍ॅथलीट ठरला होता. त्याच वेळी, त्याच वर्षी डायमंड लीग जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू देखील ठरला. एकामागून एक ऐतिहासिक विजय मिळवून तो आता जगातील खेळाडूंबद्दल सर्वाधिक लिहिला जाणारा खेळाडू बनला आहे.

 

दरवर्षी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अशा खेळाडूंची यादी प्रसिद्ध करते ज्यांच्याबद्दल सर्वाधिक लिहिले गेले आहे.
या यादीमध्ये आता नीरज चोप्राने प्रथम स्थान पटकावले आहे.
या वर्षी त्याच्या नावावर 812 लेख लिहिले गेले आहेत.
यानंतर, जमैकाची अ‍ॅथलीट इलेन थॉम्पसन-हेरा दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यांच्यावर 751 लेख लिहिले गेले आहेत.
त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शेली अ‍ॅन फ्रेझरवर 698 लेख लिहिले गेले आहेत.
तर उसेन बोल्टवर आतपर्यंत 574 लेख लिहिले गेले आहेत.

 

Web Title :- Neeraj Chopra | another golden feat by indias golden boy neeraj chopra broke usain bolts record

 

हे देखील वाचा :

Malaika Arora | मलायका अरोराला ट्रोल करणाऱ्यांना भारती सिंगने सुनावले खडेबोल; म्हणाली “तुम्ही काय तिचे……”

Pune PMC News | मुंढवा येथील गोठेधारकांच्या पुर्नवसनाची प्रक्रिया अनेक महिन्यांपासून ठप्प; ‘मालमत्ता विभाग’ अतिरिक्त आयुक्तांच्या ‘रडार’वर

Pune PMC News | पुढील काळात होणार्‍या लिपिक भरती प्रक्रियेत उमेदवाराची शैक्षणिक आर्हता 10 वी उत्तीर्ण ऐवजी पदवीधारक करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील

 

Related Posts